चोरीच्या उद्देशाने गेला घरात; पुढे घडले भयानक, पहा बातमीत सविस्तर.
एक जण चोरी करण्याच्या उद्देशाने घरामध्ये घुसतो पुढे काय करतो ते पहाच. चोऱ्या करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आपण सगळ्यांनी ऐकल्या असतीलच. सदरील घटना ही ठाण्यामधील वागळे इस्टेट या भागातील किसन नगर येथील आहे. सदरील ठिकाणी जिजाबाई केदार वय वर्ष 65 या वयोवृद्ध महिला 5 सप्टेंबर पासून बेपत्ता असल्याची तक्रार श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये 7 सप्टेंबरला करण्यात आली होती.
वयोवृद्ध महिलेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी जिजाबाई केदार यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता, घराला बाहेरून कुलूप असल्याचे त्यांच्या निदर्शनात आलं. मात्र घरातून दुर्गंध येत होता म्हणून पोलिसांनी घराचं कुलूप तोडलं. घरात प्रवेश करतात पोलिसांना जिजाबाई यांचा कुजलेला मृतदेह सापडला. तो अगदी रक्ताच्या धारोळ्यात पडलेला होता. पोलिसांना कुठलाही पुरावा न मिळाल्याने त्यांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता.
या बेपत्ता असलेल्या वयोरुद्ध महिला मृत अवस्थेमध्ये घरातच रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या, त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी जागेचा पंचनामा केला असता, कुठलाही पुरावा मिळाला नाही. आणि हा पुरावा नसतानाही तपासाला त्यांनी सुरुवात केली. श्रीनगर पोलीस ठाण्याचे पथकाने आरोपीविरुद्ध कोणताही पुरावा नाही तरीदेखील मोठ्या कौशल्याने, चिकाटीने याबाबतचा तपास करून मृत वयोवृद्ध महिलेच्या शेजारी रहिवासी असलेले नारायण केवट वय वर्ष 27 यांना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांची चौकशी केली असता,पोलिसी खाक्या दाखवल्यामुळे हे सगळं कृत्य त्यांनी केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याचप्रमाणे जिजाबाई यांच्या अंगावरील दागिने नारायण यांनी आपल्या आईकडे दिल्याची कबुली देखील दिली.
यानंतर पोलिसांनी नारायण व त्यांची आई यांना अटक केली असून जिजाबाई यांच्या बाबतची मिळालेली माहिती अशी की, या भिशी चालवत असायच्या आणि भिशी मधून जे पैसे घ्यायचे ते पैसे ते व्याजाने द्यायचे. पण जिजाबाई या घरामध्ये एकट्याच असल्याने त्यांचा शेजारी नारायण हा रात्री पैसे चोरण्याचा उद्देश ठेवून घरात घुसला. मात्र आपल्या घरात कोणीतरी घुसले आहे याची चाहूल जिजाबाई यांना लागली. आणि त्यांना जाग आल्यामुळे त्यांनी नारायण यांना पाहताच विरोध करण्याचा प्रयत्न केला.
मात्र नारायण यांनी जिजाबाई यांच्या गळ्यावर शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर घराची झाडाझडती घेतल्यानंतर पैसे मिळाले नाही म्हणून त्याने जिजाबाई यांच्या अंगावर असणारे दागिने काढून घेऊन त्यांच्या घराला बाहेरून कुलूप लावले. या प्रकरणाची सर्व माहिती आपल्या आईला दिली आणि दागिने देखील नारायण याने त्याच्या आईकडे दिले. यामध्ये पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत खुनाचा गुन्हा उघड करून माय लेकाला अटक केलं. पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल परिमंडळ पोलीस उप आयुक्त यांनी उत्कृष्ट तपास व कामगिरी बाबत पोलीस धोंडे, राठोड, शेंडगे यांना 15000 च्या बक्षीसाने सन्मानित केलं.