मनोरंजन : मा खासदार गडाख यांनी केला KFP स्टुडीओच्या कलाकरांचा सन्मान.
ग्रामीण भागातील आपल्यासारखे कलाकार इतकं छान काम करतात याचा मला खूप अभिमान आहे. आपला नैसर्गिक अभिनय आम्हां सर्वांना खूप आवडतो. आम्ही सर्वजण आपली मालिका खूप आवडीने पाहतो. आपल्या मालिकेतील गावाकडील विषय व गावाकडील भाषा आम्हांला खूप आवडते. आपल्या ग्रामीण भागात खूप कला आहे. ती कला शोधली पाहिजे. तुम्ही तरुण पोरांनी ती कला शोधली, व्यवस्थित मांडली व सर्वांपर्यंत पोहचवली.
ग्रामीण भागात आपली मुक्कामपोस्ट भन्नाटवाडी मालिका खूप आवडीने पाहिली जाते. ग्रामीण भागातील तुम्ही तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता हा आधुनिक व्यवसाय निवडला व ग्रामीण भागातील अनेक कलाकारांना संधी दिली ही आनंदाची गोष्ट आहे. खूप मोठे व्हा. एखादा मराठी चित्रपट तयार करा.” असा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक व माजी खासदार यशवंतरावजी गडाख साहेब यांनी Q मराठी चॅनेलवरील मुक्कामपोस्ट भन्नाटवाडी या मालिकेतील कलाकारांचे कौतुक केले.
सध्या Q मराठी चॅनेलवर गाजत असलेल्या मुक्कामपोस्ट भन्नाटवाडी या मालिकेतील श्रीगोंदा येथील कृष्णा फिल्म प्रोडक्शनच्या टीमला यशवंतराव गडाख साहेब यांनी घरी निमंत्रित करून सुमारे दोन तास संवाद साधला. यशवंतराव गडाख साहेब व नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुनिता गडाख यांनी भेटवस्तू व पुस्तके देऊन सर्व कलाकारांचा सन्मान केला.
यावेळी दिग्दर्शक नितीन अस्वर, सोमीनाथ अस्वर, काजल शिंदे, केरू अस्वर, संदीप अस्वर, किरण झांबरे, अमृत झांबरे, इंदुबाई दरवडे, रुपाली दरवडे हे कलाकार उपस्थित होते.
जावेद शेख, आदेश टेकाळे, सुधाकर कोकाटे व प्रा.देविदास साळुंके यांनी या भेटीचे नियोजन केले.