अमरावतीत ‘ डर्टी पिक्चर ‘ पाहून दृश्य पाहून पोलीस सुद्धा चक्रावले. पुढे काय घडलं ? पहा बातमी सविस्तर.
अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शीलांगण रोड स्थित मॉर्निंग ब्लेंड कॅफेवर राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. पाच तरुणांना व पाच तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे..
पोलिसांनी अचानक एका कॅफेवर धाड टाकली. समोर दिसणारे दृश्य पाहून पोलीस सुद्धा चक्रावले. या प्रकरणात पाच तरुण तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे.
राजापेठ पोलिसांना सदर कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यावरून राजापेठ पोलिसांनी सोमवारी सदर कॅफेवर कारवाई करत पाच तरुणी, पाच तरुण व दोघे संचालक असे एकूण १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
याआधी, जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील दोन लॉजिंगवर ऑगस्ट महिन्यात पोलिसांनी छापा टाकला. या लॉजवर मुला मुलींची १३ जोडपी सापडली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते, याच दरम्यान लॉज मालक व दलालांनाही ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांच्या कारवाईने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली होती, मात्र छापेमारी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींनी आपण तर आपल्या मर्जीने इथे आलो, असा दावा केला होता.