हिंगोलीत खळबळ! गुप्तांग कापलेले, नग्नावस्थेत आढळला मृतदेह; पोलीसही चक्रावले पहा बातमी सविस्तर.
अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत असतात याच प्रमाण आता वाढत आहे .अश्यात हिंगोली जिल्ह्यातून एक बातमी समोर येत आहे . वसमत शहरातील कवठा रोड परीसरातील स्मशानभूमीत नग्नावस्थेत २० वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी शहर पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
वसमत कवठा मार्गावर आसलेल्या स्मशानभूमीत आज सकाळी असलम सरफराज ( वय २० वर्षे, राहणार- बुखारी तकीया) या तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे गुप्तांग कापलेले असून शरीरावर जखमा दिसून येत होत्या. ही माहिती शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, दिलीप पोले, शेख नय्यर यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते. मृतदेहाची पाहणी करत असताना मृताचे आधार कार्ड सापडल्याने त्याची ओळख पटली. शहर पोलिसांनी घटनास्थळाची पूर्ण पाहणी करून तपास सुरू आहे. या घटनेमुळे वसमत शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
प्रेम प्रकरणातून घडली घटना?
मागील महिना हा दरोडे, चोऱ्या या घटनांनी गाजला आहे. आज वसमत शहरात घडलेली घटना ही प्रेम प्रकरणांतून घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून, तशा प्रकारे नागरिकांमधून दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळते आहे. अध्या या प्रकरणी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.पोलिसाच्या तपासानंतरच या घटनेमाचे गूढ उकलणार आहे.
अश्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहामुळे परिसरात भीतीच वातवरण निर्माण झालं आहे . कोणी? का ?कश्यासाठी ?कधी हे कृत्य केलं असेल असे अनेक प्रश्न अनुउतरित आहेत .