प्रशांत कांबळे आम आदमी पार्टी पहा कशी झाली यांची खास मुलाखत.
पुणे प्रतिनिधी मंगेश गांधी
1) तुमचे पूर्ण नाव व पक्ष
- प्रशांत प्रकाश कांबळे आम आदमी पार्टी
2) तुम्ही या क्षेत्रात कसे आला.
- मी रिक्षा पंचायत मध्ये काम करत असताना अनेक कष्ट करायच्या हक्कासाठी भांडत असताना कुठलेही काम झाले नाही उलट कष्ट करायचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत सोशल मीडिया पहात असताना दुसरीकडे माननीय केजरीवाल दिल्लीचे काम बघून मी या क्षेत्रामध्ये आलो 3) तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करताना काही अडचणी आल्या का.
- हो नक्कीच त्याचे कारण विरोधकांकडे बळ असेल, आर्थिक बळ त्यांची एवढ्या वर्षाची कारकीर्दता राजाचाच मुलगा राजा झाला पाहिजे अशी असलेली भावना त्यामुळे नक्कीच राजकीय जीवनामध्ये त्रास होणार
4) तुम्ही काम करत असताना लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता.
- अतिशय चांगला आहे. हे फक्त बोलायचं म्हणून बोलत नाहीये मी माझ्या पाठीमागून लोकांना तुम्ही विचारा त्यांची मतं घ्या मग कळेल तुम्हाला
5) तुम्हाला राजकीय क्षेत्रात तसेच समाज सेवेत काम करत असताना काही अडचणी येतात का अशा निर्माण होणाऱ्या समस्येवर तुम्ही कशी मात करता.
- हो नक्कीच आल्या छोट्या मोठ्या अडचणी या येत असतात त्या अडचणी वरती मात करून अनेक लोकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. आणि लावतो आहे
6) सध्या राजकीय वातावरण कसे चालू आहे योग्य की अयोग्य.
काही बदल सुचवायचे असल्यास तुम्ही काय सांगाल.
- सध्याचे राजकारण हे अयोग्य आहे. माझा वार्ड मध्ये खूप अडचणी आहे. मला ह्यामध्ये एकच सुचवायचं जनतेची कामे झाली पाहिजे, या अडचणीतून जनतेला पूर्णपणे मोकळ केलं पाहिजे आणि राजकारण्यांनी बोलण्याच्या दर्जा सुद्धा सुधारला पाहिजे.
7) तुम्हाला असे वाटते का तुमच्या वार्ड मध्ये काही कामे राहिलेली आहेत.
वार्डाच्या विकासाच्या पूर्ततेबाबत तुमचा हेतू स्पष्ट काय आहे.
- माझ्या वॉर्डमध्ये तर असे अनेक विषय आहेत एकतर पिण्याचे पाणी, नाल्याचे प्रॉब्लेम आहे. अंतर्गत रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरती वाहतंय त्याच्यावरती कुठलेही काम होत नाही दत्तनगर नेहमी जाम असतो. रस्त्याचा एकच पर्याय आहे. लोकांना अर्धा एक तास अडकून पडावं लागतं कात्रज चौक अक्षशा अतिक्रमाणे भरून गेलेला आहे. या सर्वांचे पूर्तता करणे हाच एक उद्देश आहे.
8) तुमचा तुमच्या वॉर्डामध्ये दांडगा जनसंपर्क आहे मग तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन काम करता का व कसे करता.
- हो नक्कीच लोकांना काय हवंय त्यानुसार काम करत राहायचं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपण विचारायचं त्यामुळे लोकांचा विश्वास हा मी कमी वेळामध्ये संपादन केलेला आहे.
9) तुम्हाला लोकांनी निवडून दिले तर तुमच्या वॉर्डमध्ये कोणत्या कामावरून सुरुवात करणार.
- मला जर लोकांनी निवडून दिल्यास ड्रेनेजचे पाणी जे रस्त्यावरती वाहतोय हे पहिलं बंद करण्यात येईल ड्रेनेची पाईपलाईन टाकल्या जाईल नव्याने मोठी आमच्या एरियामध्ये कुठलीही बाग नाही संस्कृती कार्यक्रम करण्यासाठी 200,100 लोकांसाठी का होईना एक हॉल उपलब्ध केला जाईल बाकीची इतर कामाची आहेत रस्ता पाणी लाईट ह्या भागात ती अनेक लोक अजूनही वंचित आहेत ह्या वरती प्रामुख्याने काम केले जाईल हे मात्र नक्की
10 ) माझी राजकीय भूमिका जर पक्षाने मला उमेदवारी जर दिली तर मी प्रचार बंद व्हायच्या दोन दिवसाआधी दोन घोषणा करणार आहे. त्या आत्तापर्यंत कुठल्याही नेत्याने केल्या नाही किंवा माझ्या ऐकण्यात अजिबात नाही. त्या दोन भूमिका मी त्यावेळेस लोकांसमोर स्पष्ट करेल.