शासकीय कामासाठी सर्रास धरणातून गौण खनिजाचा उपासा,माळेगाव-पिंप्री धरणाची चाळणी.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव, दि.१६..शासकीय कामासाठी सर्रास संबंधित ठेकेदाराकडून धरणांतून कोट्यवधी रु चा अवैध गौण खनिजाचा सर्रास उपसा रविवारी भरदिवसा केला रविवारी शासकीय सुटी पाहून संबंधीत ठेकेदाराने डाव साधल्याची चर्चा आहे.दरम्यान धरण परिसरातील शेतकऱ्यांनी या ठेकेदाराला याबाबत विचारणा केली असता त्या ठेकेदारांच्या कामावरील व्यक्तींनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र दिवसभरात माळेगाव-पिंप्री धरणाची सर्रास गौण खनिजा चा उपसा केल्याने धरणाची चाळणी झाली आहे…
निंबायती फाटा ते निंबायती गाव या चार की मी रस्त्यावरील खडीची दबाई करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांने सर्रास आड मार्गावर असलेल्या माळेगाव-पिंप्री या धरणांतून अवैध गौण खनिजाचा सर्रास उपासा करून या ठिकाणाहून रविवारी दिवसभर कोट्यवधी रु चा गाऊन खनिजाची वाहतूक केली आहे या प्रकरणी शेतकऱ्यांनी अडवणूक केली असता आम्ही गौण खनिज परवाना काढला आहे असे सांगून ग्रामस्थांची या ठेकेदाराच्या व्यक्तींनी दिशाभूल केली आहे. या ठेकेदारांने जर परवाना घेतला असेल तर मग सुटीच्या दिवशी का गौण खनिजाची वाहतूक करत आहे असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे…
माळेगाव-पिंप्री धरणातून सर्रास जे सी बी आणि डंपर च्या साहाय्याने सर्रासपणे गौण खनिज काढून वाहतूक केल्यामुळे या धरणाची चाळणी झाली असून अवजड साहित्याने या धरणाच्या भिंती धोकादायक झाल्या आहेत आधीच पाऊस कमी झाल्याने धरणाची पाणीपातळी कमी असून त्यातच या अवैधरीत्या वाहतूक झालेल्या गौण खनिजामुळे धरणाची चाळणी झाली आहे.शासकीय कामावर सर्रासपणे कोट्यवधी रु चा महसूल बुडवून या ठेकेदारांने धरणांत डंपर उतरवुन गौण खनिजाची वाहतूक केली आहे.