मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर फडणवीस बोललेच.

आज होणाऱ्या फ्लॉर टेस्टला आणखी अवधी भेटावं व त्यावर स्टे लागावा म्हणून काल ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. शेवटच्या तीन तासांमध्ये ठाकरे सरकारचे वकील व शिंदे गटाचे वकील यांच्यामध्ये कोर्टामध्ये वाद-विवाद चालू होते. तीन तासानंतर सुप्रीम कोर्टाने अर्धा तास मागून निकालाची प्रतीक्षा करण्यास सांगितले. आणि अखेर काल रात्री ९ नंतर सुप्रीम कोर्टाने आपलं निर्णय सुनावला. यामध्ये आज होणाऱ्या बहुमत चाचणीचा रद्द करून आजच बहुमत चाचणी होणार असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. यानंतर ठाकरे सरकारने अवघ्या काही तासातच माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी राजीनामा दिला. त्यांनी फक्त मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देता आमदारकीचाही राजीनामा दिला.
तसेच दुसर्या बाजूला असणारे फडणवीस यांच्या आनंदाला पारा राहिला नाही. राजकीय घडामोडी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यानंतर मुंबईमधील हॉटेलमध्ये भाजप आमदार सोबत फडणवीस यांनी चर्चा केली. यामध्ये बोलताना ते म्हणतात की, एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असणारे 40 आमदारांची आभार मानावे तेवढे कमीच. त्यांचे विशेष आभार त्यांच्यावर अन्याय झाला त्याच्या विरोधात आवाज उठविण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटारीची हिम्मत गेली त्याचा जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आता पुढील अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना न्याय द्यायचा आहे. जोपर्यंत पुढच्या सूचना येत नाही तोपर्यंत सगळे आमदारांनी मुंबईतच थांबावं असं सांगितलं.
काल उशिरा रात्री उद्धव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल जो सगळ्यात मोठा पक्ष आहे किंवा भाजपला सत्ता स्थापनेसाठी लागणारा बहुमत आहे की नाही याचा विचार करतील. जर भाजपने बहुमताच्या आकडेवारी पत्र दिले तर राज्यपाल त्यांना शपथविधीसाठी बोलवून घेतील. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये फडणवीस यांचे शपथविधी देखील होऊ शकतो.