ठरलं ? या दिवशी होणार फडणवीस यांचा शपथविधी !!
काल घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर ठाकरे सरकार रात्री उशिरा राजीनामा देतात ते मुख्यमंत्री पदासोबतच आमदारकीचा ही राजीनामा देतात. ठाकरे सरकार आपली बाजू मांडण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतात पण काल सुप्रीम कोर्टामधूनही ठाकरे सरकारच्या विरुद्ध निकाल निघतो. आज जे बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी वेळ दिला होता त्यावर आणखी काही दिवसांचा अवधी भेटावं म्हणून ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली होती. पण सुप्रीम कोर्टाने आणखी मुदत वाढवून देण्यासाठी नाकार दिला. आणि बहुमत चाचणी ही आजच होणार असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. जेव्हा सुप्रीम कोर्टाचा असा निकाल येतो त्यावेळेस भाजपची बाजू ही वरची होते आणि त्यामध्ये जवळजवळ भाजप सरकारच निवडून आल्याचे सिद्ध होते. यामध्ये जेव्हा ठाकरे सरकारकडून राजीनामा दिला जातो तेव्हा दुसरीकडे भाजपकडून वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोष केला गेला. आणि कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत पुढील मुख्यमंत्रीपद भूषवण्यासाठी फडणवीस यांची तयारी होते.
तसेच दुसर्या बाजूला असणारे फडणवीस यांच्या आनंदाला पारा राहिला नाही. राजकीय घडामोडी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यानंतर मुंबईमधील हॉटेलमध्ये भाजप आमदार सोबत फडणवीस यांनी चर्चा केली. यामध्ये बोलताना ते म्हणतात की, एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असणारे 40 आमदारांची आभार मानावे तेवढे कमीच. त्यांचे विशेष आभार त्यांच्यावर अन्याय झाला त्याच्या विरोधात आवाज उठविण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटारीची हिम्मत गेली त्याचा जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आता पुढील अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना न्याय द्यायचा आहे. जोपर्यंत पुढच्या सूचना येत नाही तोपर्यंत सगळे आमदारांनी मुंबईतच थांबावं असं सांगितलं.
काल उशिरा रात्री उद्धव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल जो सगळ्यात मोठा पक्ष आहे किंवा भाजपला सत्ता स्थापनेसाठी लागणारा बहुमत आहे की नाही याचा विचार करतील. जर भाजपने बहुमताच्या आकडेवारी पत्र दिले तर राज्यपाल त्यांना शपथविधीसाठी बोलवून घेतील. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये फडणवीस यांचे शपथविधी देखील होऊ शकतो.