...
पश्चिम महाराष्ट्र

यवतमाळ येथून निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात ; 10 जणांचा आगीत होरपळून मृत्यू.

यवतमाळ प्रतिनिधी -: औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर चिंतामणीची खाजगी लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास भीषण अपघातात झाला.या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला.या आगीत बसमधील जवळपास दहा प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं. घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन ते चार वाहनं तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. या अपघातामध्ये यवतमाळतील पाच जणांचा समावेश असून त्यामध्ये मृतक मिराबाई राठोड,वैशाली बागडे,अजय कुचलकर तसेच लखन व उज्वल असे असुन यांची आडनावे समजली नाही.

हि बस साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या तर आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीमुळे जळून खाक झाले. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.    

सदर अपघातानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला टँकरने रस्त्याच्या कडेला थांबला. सदर अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बस मधून हलविण्यात आले. अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकी देखील धाव घेतली तसेच पोलिसांना देखील कळविले मात्र पोलीस वेळेच घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.३८ प्रवासी बसमध्ये होते. त्यापैकी १० प्रवशी होरपळून ठार झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. १० मृत झाले असून सर्व पुरुष असल्याचे प्रशासनाने सांगितले.

यामध्ये एक मृतकाची कवटी फक्त आढळून आली. ती लहान मुलाची असू शकते असे पोलिसांनी सांगितले. काही प्रवाशांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ३८ प्रवाशांमध्ये १० महिला, २० पुरुष, ०८ बालके होती अशी माहिती देण्यात आली आहे.या अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बसमधून हलविण्यात आले.सदर अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकीत धाव घेतली. तसंच पोलिसांना याबाबत कळवलं. मात्र, पोलीस वेळेत घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!