बाप रे !! बंडखोर नेत्यांवर होत आहे तब्बल एवढा खर्च.

शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केला व त्यांच्या सोबत ३० – ४० आमदार घेऊन सुरत येथे रवाना झाले. त्यानंतर सुरत वरून ते गुवाहाटी येथे गेले. आपल्याकडे शिवसेनेचे आमदार आहेत असं त्यांनी सांगितलं आणि संपूर्ण राजकारण त्यांनी बदलून टाकला पण या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत जे आमदार घेऊन गेले आहेत त्यांना एका शानदार अशा हॉटेलमध्ये थांबवला आहे या आमदारांचा हॉटेलमधील खर्च तुम्हाला माहित आहे का ?
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे 42 आमदार घेऊन गेले आहेत. तसेच इतर अपक्ष आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेल मध्ये राहणाऱ्या या आमदार यांच्यावर सध्या लाखो रुपयांची उधळण चालू आहे. एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना ५० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात 40 पेक्षा जास्त आमदार शिवसेनेचे आहेत सोबतच एकनाथ शिंदे यांना इतर अपक्ष आमदार देखील सोबतीला आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यासोबत एकनाथ शिंदे असे म्हणतात की आम्ही बहुमताचा आकडा कधीच पार केले आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक, कायदेशीर बाबी देखील पूर्ण झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेलमध्ये 42 आमदार आहेत शिवसेना पक्षा सोबत ज्यांनी बंडखोरी केली ते आमदार आधी गुजरातला सुरत मध्ये शानदार हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्यानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना चार्टर्ड प्लेन ने गुवाहाटी येथे पाठवण्यात आले. या आमदारांसाठी आसामच्या रेडिसन ब्लू हॉटेल मध्ये तब्बल 70 खोल्या बुक केल्या आहेत असं समजलं आहे. या हॉटेलचे एका खोलीचे भाडे हे ६८०० रु पासून सुरू होते तसेच डिलक्स रूमचे भाडे ८००० रु पर्यंत आहे. यावरून तुम्हाला याचा अंदाज येईल की, आपल्या राज्यामध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्ष मध्ये किती पैसा खर्च केला जात आहे. इतकेच नाही तर या आमदारांवर 56 लाख रुपये ७ दिवसांसाठी हॉटेलचे भाडे येणार आहे.
रॅडिसन हॉटेलच्या आसपास सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. हा खर्च भाजपाने केला असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. असे म्हटले जात आहे की, हॉटेलमध्ये 196 खोल्या आहेत. आमदार आणि त्यांच्या टीमसाठी बुक केलेल्या 70 खोल्यांव्यतिरिक्त, कॉर्पोरेट डीलवर आधीच बुक केलेल्या खोल्या सोडता व्यवस्थापन नवीन बुकिंग घेत नाहीत,