विखे कुटूंब व त्यांच्या स्विय सहाययकांच्या मनमानीला कंटाळून भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश..
पाथर्डी : प्रतिनिधी
विखे कुटूंब व त्यांच्या स्विय सहाययकांच्या मनमानीला कंटाळून तालुक्यातील भाजपाच्या युवकांनी तसेच विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शुक्रवारी प्रवेश केला.
निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेनिमित्त देवराई येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत नीलेश लंके तसेच आ. प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत या युवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. लंके व आ. तनपुरे यांनी त्यांचे स्वागत केले.
भाजपासह धाडस प्रतिष्ठाणचे अक्षय भैय्या ढाकणे, नययुम शेख, शहारूख शेख, इब्राहिम शेख, हारून शेख, अययाज सययद, सुरज ढाकणे, तुकाराम तानवडे, राहुल खेडकर यांच्या नेतृत्वाखाली तरूणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून नीलेश लंके हे कार्यरत असून त्यांनी कोरोनासह विविध प्रश्नांमध्ये केलेले काम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.
आपला प्रतिनिधीही असाच असावा यासाठी आम्ही त्यांच्या विचारासोबत जाण्याचा निर्णय घेतला असून लंके यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही परीश्रम घेणार असल्याचे या तरूणांनी सांगितले. देवराई येथे झालेल्या सभेत भाजपा तसेच इतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. नीलेश लंके, आ. प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचे स्वागत केले.