आधी क्षुल्लक कारणावरून वाद आणि नंतर त्याने पहाटेच बायकोला…..

अहमदनगर प्रतिनिधी,
व्यसनाधीन असलेल्या पतीने पत्नीला किरकोळ कारणावरून मारहाण केली. त्यानंतर पहाटेच्या दरम्यान पत्नीच्या डोक्यात लोखंडी गज मारून तीला जिवे ठार मारले. राहुरी तालूक्यातील डिग्रस येथे दिनांक २८ मे २०२३ रोजी पहाटेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

या घटनेतील आरोपी सुरेश भानुदास पवार हा राहुरी तालूक्यातील डिग्रस येथील कोयबामाळ येथे त्याची मयत पत्नी अनिता सुरेश पवार, वय ३४ वर्षे, तसेच एक मुलगी, एक मुलगा यांच्यासह राहत होता. पती पत्नीचे भांडण झाल्याने पत्नीने तीचा भाऊ लक्ष्मण भिवराव शिंदे, राहणार नेवासा. याला बोलावून घेतले. त्यामुळे दिनांक २७ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मयत अनिता हिचा भाऊ लक्ष्मण भिवराव शिंदे हा बहिणीच्या घरी डिग्रस येथे गेला होता. तेव्हा आरोपी तेथे आला. त्याने पत्नीच्या भावाला घरात पाहून पत्नीला मारहाण केली. तेव्हा मयताचा भाऊ लक्ष्मण शिंदे हा भांडण सोडवीत असताना आरोपी सुरेश पवार याने त्याला शिवीगाळ करुन धक्काबूक्की केली. तसेच तू मध्ये आलातर तूला जिवंत मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर भाऊ निघून गेला. मात्र आरोपी सुरेश पवार याने २८ मे २०२३ रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पत्नी अनिता सुरेश पवार ही गाढ झोपेत असताना तीच्या डोक्यात लोखंडी लोखंडी गज मारला. त्यामध्ये ती जागेवरच गतप्राण झाली.

घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे, पोलिस उप निरीक्षक निरज बोकील, हवालदार हनुमंत आव्हाड, पोलीस नाईक गणेश सानप, सागर नवले, चालक पोलीस नाईक जालिंदर साखरे आदि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यांनी आरोपी सुरेश भानुदास पवार याला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले.

मयताचा भाऊ लक्ष्मण भिवराव शिंदे, वय ३१ वर्षे, रा. निंभारी, ता. नेवासा. याच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश भानुदास पवार याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ५७४/२०२३ भादंवि कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे खुन्हाच्या गुन्हाची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे हे करीत आहे.