आधी अपमान, नंतर सारवासारव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.

राज्यपाल महाशय आता आपल्या विधानावर सारवासारव करू लागले आहेत.
मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक असल्याचं आता राज्यपाल म्हणत आहेत.
मात्र हेच राज्यपाल पूर्वी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकलं तर मुंबई आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणार नाही, असं वक्तव्य याच राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केला होता.
त्यामुळेच सर्व स्तरातून त्यांच्यावरती टीका केली जात होती. अशातच आता राज्यपालांनी या वरती स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक असल्याचं राज्यपाल म्हणाले. मात्र आधी विधान करताना हेच राज्यपाल मराठी माणसाच्या योगदानाबद्दल विसरले होते की काय असा सवाल नेटकरी विचारत आहेत. मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीतून राज्यपाल म्हणून मला संधी मिळाली आहे. याचा मला अभिमान वाटतो असं म्हणत बरंच काही त्यांनी गोडवे मुंबईबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल गायले आहेत. मात्र सुरुवातीला मुंबईबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल मराठी माणसाबद्दल अपमान होईल असं विधान केल्याने त्यांच्यावर ती प्रत्येकजण संताप व्यक्त करतोय. जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवलेला आहे. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठला प्रश्न येतच नाही आणि तसे धाडस कोणीही करू नये असे देखील म्हटले जाते.