शाळेच्या परिसरात असणाऱ्या दुर्गंधीच्या ठिकाणी फुलवली फळ – फुलबाग, सरकारी शाळेतला उपक्रम.
आजकाल सर्वजण आपल्या पाल्याला चांगली शिक्षण मिळावे या करता सरकारी शाळेकडे कल कमी होऊन इंग्लिश मीडियम स्कूल कडे वळत आहे. त्यामुळे सरकारी शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटताना आपण पाहत आहोत. त्याचबरोबर सरकारी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी सरकार बरेचसे उपक्रम योजना या राबत असतात. पण तरी देखील आपण पाहतो की, बऱ्याचदा सगळ्यांनाच वाटते की, माझ्या मुलांनी इंग्लिश स्कूल मधून शिक्षण घ्यावं, फाडफाड इंग्रजी बोलावं आणि म्हणून पालक मुलांना इंग्रजी शाळेत घालतात.
प्रत्येकाची परिस्थिती ही आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण देण्याइतपत नसते म्हणून त्यांना पर्यायी सरकारी शाळा हा एकवेळ मार्ग असतो. पण आता सरकारी शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात. श्रमदान केले जाते, त्यांचा कलागुणांना वाव दिला जातो, देशातील मोठ मोठे नेते, वैज्ञानिक, हे सरकारी शाळेतून घडले आहेत. पण आजकालच्या स्पर्धेच्या युगात सरकारी शाळा मागे पडली आहे. असे असताना देखील एका शाळेने एक आगळा वेगळा उपक्रम केला आहे. शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य होते तिथे आज फळबाग फुलवली आहे.
ही शाळा बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्यातील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा हि आहे. या शाळेमध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला आहे आणि या उपक्रमामुळे शाळेचा आगळे वेगळेपणा व आदर्श निर्माण झाला आहे. याआधी या जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पूर्वी घाणीचे साम्राज्य असायचे आणि यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली होती. आणि या सगळ्याचा त्रास विद्यार्थ्यांना नाहक सहन करावा लागत होता. आणि म्हणून पर्यायी म्हणून विद्यार्थ्यांना हा त्रास कमी कसा करायचा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांना एक शक्कल सुचली याबाबत त्यांनी ग्रामपंचायत बरोबर एक चर्चा करून एक निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाला ग्रामपंचायत ने देखील मंजुरी दिली.
ग्रामपंचायत आणि मुख्याध्यापक यांच्याकडून शाळा परिसरामध्ये बाग फुलवण्याचा निर्णय झाल्यानंतर या शाळेच्या परिसरात असणारे घाणीचे साम्राज्य जाऊन या ठिकाणी फुलबाग व भाजीपाला बहरला आहे हे संपूर्ण यश जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत यांना जात आहे. या जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात जांभूळ 3, आंबा 2, चिकू 3, आवळा 3, मोसंबी 4, पेरू 2, लिंबू 2, नंदीवाण 1, वड 4, करंजी 1, नारळ 6, गुलाब 4, कढीपत्ता 3 अशी वेगवेगळी झाडे लावली आहेत.
एवढेच नाही तर याला जोड फळांच्या झाडांसह येथे वांगे, टोमॅटो, मिरची, काकडी, दोडका, भेंडी, कोथिंबीर, भोपळा, वालाच्या शेंगा लिंबू, अशा आणखी पालेभाज्या देखील लावण्यात आल्या आहेत. या बागेला ग्रामपंचायत मार्फत बोरचे पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जातो. तसेच शालेय पोषण आहारामध्ये याच बागेतील भाजीपाल्याचा आहारामध्ये उपयोग केला जातो. मागील दोन वर्षांपूर्वी या शाळेची शाळेने व ग्रामपंचायतीने या बागेची लागवड केली आहे. या बागेला तयार करण्यासाठी 35 हजारांचा खर्च आला आहे. यासाठी लागणारा खर्च शाळा व ग्रामपंचायत यांनी मिळून केला आहे.