माजी जि. प उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांचा गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित.

जिल्हापरिषदेच्या निवडणुकांचा रस्ता मोकळा झाला. गट आणि गणांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. कोणत्या गणात किंवा कोणत्या गटात कसा आरक्षण जाहीर झाले. कुणाची वर्णी लागते, इच्छुक आहेत त्यांचं काय होतंय पाहूयात या बातमीत.. जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांच्या आरक्षणात आता कभी खुश, कभी गम असे चित्र पाहायला मिळत आहे.
माधराव लामखेडे यांच्या गटात अनुसूचित जातीसाठी, शरद शेंडगे यांच्या गटात ओबीसी महिलांसाठी,
प्रताप शेळके आणि राजेश परजणे यांचा गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. जिल्हा परिषद पंचायत समिती गट आणि गणांचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या गटांची तर संबंधित तहसील कार्यालयात पंचायत समितीचे गणांचे आरक्षण सोडत काढण्यात आली.
समशेरपूर (सर्वसाधारण), देवठाण (सर्वसाधारण महिला), धुमाळवाडी (अनुसूचित जमाती महिला), राजूर, पाडाळणे (इतर मागास वर्ग), कोतूळ (सर्वसाधारण महिला).
संगमनेर – समनापूर (सर्वसाधारण महिला), तळेगाव (इतर मागास वर्ग), आश्वी बुद्रुक (अनुसूचित जमाती महिला), जोर्वे, संगमनेर खुर्द (सर्वसाधारण), घुलेवाडी (अनुसूचित जाती महिला), धांदरफळ बुद्रुक, चंदनापुरी (सर्वसाधारण महिला), साकूर, बोटा (सर्वसाधारण).
कोपरगाव – सुरेगाव (अनुसूचित जमाती), शिंगणापूर (अनुसूचित जमाती महिला), करंजी बु, (इतर मागास वर्ग महिला), सवंत्सर, कोळपेवाडी (सर्वसाधारण महिला), पोहेगाव बुद्रुक (सर्वसाधारण).
राहाता – पुणतांबा, वाकडी, बाभळेश्वर, लोणी खुर्द (सर्वसाधारण महिला), साकुरी (सर्वसाधारण), कोल्हार बुदु्रक (इतर मागास वर्ग)
श्रीरामपूर – उंदीरगाव, बेलापूर (इतर मागास वर्ग), टाकळीभान, निपाणी वडगाव (सर्वसाधारण महिला), दत्तनगर (इतर मागास वर्ग महिला).
नेवासा – सलाबतपूर, भेंडा बुद्रुक, शनिशिंगणापूर (सर्वसाधारण महिला), सोनई, भानस हिवरे (इतर मागास वर्ग महिला), बेलपिंपळगाव (अनुसूचित जमाती महिला), पाचेगाव (अनुसूचित जमाती), चांदा (अनुसूचित जाती महिला).
शेवगाव – दहिगाव ने, बोधगाव (इतर मागास वर्ग), मुंंगी (इतर मागास वर्ग महिला), भातकुडगाव (इतर मागास वर्ग महिला), अमरापूर (अनुसूचित जाती).
पाथर्डी – कासार पिंपळगाव (सर्वसाधारण महिला), भालगाव, माळी बाभुळगाव, मीरी, टाकळी मानूर (सर्वसाधारण).
राहुरी- सात्रळ, उंबरे (इतर मागास वर्ग), टाकळीमिया (सर्वसाधारण महिला), गुहा, वांबोरी (सर्वसाधारण), बारगाव नांदूर (अनुसूचित जमाती).
श्रीगोंदा – पिंपळगाव पिसा (सर्वसाधारण महिला), कोळगाव, मांडवगण (अनुसूचित जाती महिला), आढळगाव, बेलवंडी (अनुसूचित जाती), लिंपणगाव, काष्टी (सर्वसाधारण).
कर्जत- मिरजगाव (अनुसूचित जाती महिला), चापडगाव, कोरेगाव (अनुसूचित जाती), कुळधरण (सर्वसाधारण), राशीन (इतर मागास वर्ग महिला).
जामखेड- साकत, खर्डा (इतर मागास वर्ग महिला), जवळा (इतर मागास वर्ग).
पारनेर – ढवळपुरी (अनुसुचित जमाती), कान्हुरपठार (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), टाकळी ढोकेश्वर, निघोज, सुपा, जवळा (सर्वसाधारण).
नगर तालुका – वडगाव गुप्ता, जेऊर, चिचोंडी पाटील (सर्वसाधारण महिला), नागरदेवळे (इतर मागास वर्ग महिला), नवनागापूर (अनुसुचित जाती महिला), दरेवाडी (सर्वसाधारण). वाळकी – सर्वसाधारण