सावळदबारा येथे ६५ बालकांची मोफत आरोग्य तपासणी व औषधीचे वाटप.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव प्रतिनिधी.दि.१० तालुक्यातील सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्रात ६५ बालकाची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आली.
येथील संजय शहापूरकर यांनी सुरू केलेल्या कुपोषण मुक्त अभियानाची सुरुवात सावळदबारा येथे झाली याप्रसंगी संजय शहापूरकर यांनी सांगितले की अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे यांच्या सहकार्याने तालुक्यात या अभियानासाठी मोफत औषधी देणार आहे
आज सावळदबारा येथील आरोग्य केंद्रात या शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ विलास राजपूत यांनी केले त्यानंतर डॉ सचिन चंद्रे व डॉ काटोले यांनी बालकाची आरोग्य तपासणी केली त्यांनतर कमी वजन असलेल्या बालकांना मोफत औषधी वाटप करण्यात आली या प्रसंगी डॉ. विलास राजपूत डॉ सचिन डॉ काटोले विकास मापारी शेख सिस्टर अंगणवाडी सेविका लता हत्तेकर राठोड सुनीता खरे सोमासे शुभम खरे यांच्या सह अंगणवाडी सेविका मदतनीस व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते