FreeFire दुष्परिणाम : बंदूक चालवल्याचा त्याला भास व्हायचा, समोरचा प्रत्येक व्यक्तीला बंदुकीने मारायचे.

आज कालच्या डिजिटलच्या काळात सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा मोबाईल पोहोचला आहे. सध्या 4जी /5G चे तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यातच मोठमोठे मोबाईल कमी किमतीमध्ये मिळत आहेत. या मोबाईलची लहान मुलांना जास्त प्रमाणामध्ये सवय लागत चालली आहे. जे लहान मुलांसाठी अतिशय गंभीर प्रश्न बनत आहे.
मोबाईल मध्ये गेम खेळणे हा त्यांचा सगळ्यात आवडता विषय ठरला आहे. ही लहान मुलं अगदी गेमच्या आहारी गेले आहेत. उदाहरणे द्यायचं झालं तर ज्यावेळेस ही लहान मुलं मोबाईल मध्ये गेम खेळत असतात, त्यावेळेस जर त्यांना एखादं काम सांगितलं तर अक्षरशः ते प्रतिउत्तर करतात किंवा मोठ्या माणसांवर धावून येतात. या प्रमाणामध्ये एखाद्या डिजिटल गोष्टींमध्ये आहारी जाणं हे नक्कीच धोकादायक आहे. अशीच एक घटना या बातमीमध्ये घडली आहे.
ऑनलाइन गेममुळे एका तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे. आणि त्यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे हा तरुण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला एका खेडेगावातला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या 20 वर्षे तरुणाला एक आजार झाला आहे. आपल्या तरुण मुलाला मानसिक आजार झाल्यामुळे त्याचे शेतकरी आई वडील काळजी पडले आहेत. या मुलाला सायकोसिस सारखा आजार झाला आहे.
तरुणाईमध्ये सध्या सर्वत्र मोबाइल फोनच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. यात शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा समावेश आहे. मोबाइल फोनमधील ऑनलाइन गेमच्या व्यसनात ( Online Game Addiction ) हरवत चाललेली तरुणाई विविध आजारांचे बळी ठरत आहे. यातून सायकोसिससारख्या आजाराचा धोका बळावत आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात राहणारा एक २० वर्षीय तरुण सध्या मानसिक आजाराने ग्रस्त झाला आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कोरोना सारख्या महामारी मध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांच्या हातात मोबाईल आला आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे मोबाईल वापरण्याचे प्रमाण हे वाढत गेले. शिक्षणासाठी वापरला जाणारा हा मोबाईल आरोग्यासाठी घातक बनला. त्याची विपरीत परिणाम आपण सगळ्यांनी अनेकदा अनुभवले असतील असेलच.
असेच या वीस वर्षे तरुणासोबत घडले आहे हा मुलगा घरात फायर करत असल्यासारखे हावभाव करत होता. तसेच हावभाव तो इतर वेळेस गावात फिरत असताना देखील करत होता आणि त्याच्या अशा वागण्याने त्याचे शेतकरी आई वडील हे चिंतेत झाले. त्यांनी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याला घेऊन गेले तेव्हा त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यास सांगितले. सध्या त्याच्यावर उपचार चालू असून तो सध्या आयसीयू मध्ये आहे.
हा तरुण फ्री फायर गेमच्या आहारी गेल्याने आपण बंदूक चालवत असल्याचा त्याला भास होत आहे. समोर असलेला प्रत्येक व्यक्ती हा शत्रू असून त्याला बंदुकीने मारलं पाहिजे म्हणून तो असं कृत्य करत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मोबाइल फोनच्या अतिवापराने झालेली तरुणाची ही अवस्था आई-वडिलांना अस्वस्थ करणारी आहे. काल-परवापर्यंत शहरांपुरता मर्यादित असणारी ही समस्या आता ग्रामीण भागात देखील येऊन पोहोचल्याने यातून आपल्या पाल्यांचे बचाव करण्याचं आव्हान पालकांच्या समोर उभं राहिलं आहे. धुळे जिल्ह्यातील हा २० वर्षीय तरुण सायकोसिस आजाराचा बळी ठरल्याची ही पहिलीच घटना आहे.