कु.इंद्रजीत मेघवाल या दलित विद्यार्थ्याला ठार मारणाऱ्या मुख्याध्यापक छेलसिंगला फाशीची शिक्षा द्या…. चर्मकार विकास संघाची मागणी!

राजस्थान येथील जालौर जिल्ह्यातील सुराणा या गावातील सरस्वती विद्यालय मध्ये इयत्ता ३ री मध्ये शिकणाऱ्या दलित विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकाच्या माठातील पाणी पिल्याने समाज द्रोही मुख्याध्यापक छेलसिंग याने कु.इंद्रजित ला २० जुलै २०२२ रोजी जबर मारहाण केली. त्यात दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी चिमुकल्या इंद्रजितचा दुर्दैवी मृत्यू झाला.अशा जातीयवादी समाज द्रोही छेलसिंग याच्यावर अँट्रासिटी ऍक्ट व खुणाचा गुन्हा नुसार गुन्हा दाखल करून सदर केस जलद कोर्टात नामाकिंत वकिलाची नेमणूक करुन चालवावा. शिक्षणा सारख्या पवित्र श्रेत्राला काळिमा फासणाऱ्या खुनी समाज द्रोही छेलसिंग याला फाशीची शिक्षा द्यावी.

अन्यथा प्रदेश अध्यक्ष मा. संजयजी खामकर साहेब यांचे आदेशानुसार मार्गदर्शिका मा. नगरसेविका सौ. आशाताई सुभाष मराठे यांचे नेतृत्वाखाली तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देणारे निवेदन परिमंडळ ६ चे पोलिस उपायुक्त मा.कृष्णकांत उपाध्याय यांना दिले.

या प्रसंगी श्री राजेश साबळे (सहसचिव महाराष्ट्र), श्री. राजनंदन चव्हाण (मुंबई सचिव) , श्री अशोक कांबळे (गटई कामगार अध्यक्ष), सौ.सुवर्णाताई कवडे(शिवाजी नगर तालुका अध्यक्षा), अविनाश सातपुते, गणेश डिडोळे, अशोक चौगुले, सौ. अच्युदेवी तिगया,अशोक पवार, महेश आहिरे, पुष्पराज माने इत्यादी मान्यवरास अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.