गौरवास्पद! सांगलीच्या पोलीस उप अधीक्षकांचा सातासमुद्रापार डंका, पटकावले मिसेस इंडिया विजेतेपद.
परदेशात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या त्या महिला अधिकाऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खाकीतील वर्दी सांभाळत या महिलेने विदेशात धमाकेदार कामगिरी केली आहे. सांगलीच्या सीआयडी पोलीस उपाधीक्षक आरिफा मुल्ला या सध्या खूप चर्चेत आहेत.
थायलंडमध्ये पार पडलेल्या ‘मिसेस इंडीया’ स्पर्धेमध्ये सांगलीच्या सीआयडी पोलीस उपअधीक्षक अरिफा मुल्ला यांनी ‘ ग्लॅमन मिसेस इंडिया’ हे विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय त्या स्पर्धेतील बेस्ट पर्सनॅलिटीच्या उपविजेत्या देखील ठरल्या आहेत. सांगलीच्या सीआयडी क्राईम विभागाच्या पोलीस उपअधीक्षिका आरिफा मुल्ला यांची देखील निवड झाली होती.
१६ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा फुकेट येथे पार पडल्या, ज्यामध्ये मिसेस इंडीया स्पर्धेत अरिफा मुल्ला या” ग्लॅमन मिसेस इंडिया “ठरल्या आहेत.या स्पर्धेत बेस्ट पर्सनॅलिटी विभागात त्यांनी उपविजेतेपद पटकावले. मुल्ला यांनी या स्पर्धेची ऑडिशन पुणे येथे दिली होती. फिल्मफेअर मिडल इस्टच्या ग्लॅमन या कंपनी तर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यांच्या या यशा बद्दल पोलीस दलासह सर्वत्र कौतुक होत आहे. एक स्त्री सात समुद्रा पार जाऊन यश हे ओढून आणू शकते याची प्रचिती या पोलीस महिला अधिकारी यांच्या या कामगिरीतून दिसून येत आहे. त्यांचा हा प्रवास महिला वर्गासाठी आदर्श होत आहे. त्यात प्रमाणे त्यांचे प्रत्येक स्थरातून तसेच कुटुंब आणि नातेवाईक यांच्याकडून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षात होताना दिसत आहे.