खुशखबर : खाद्यतेल तब्बल एवढा रुपयांनी होणार कमी, पहा बातमी सविस्तर.

येत्या काही दिवसांत सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसापासून महागाईला वाढत चालली होती, पेट्रोल, डिझेलचे, गॅस, कच्चे तेल त्यासोबत कडधान्य सगळ्याच वस्तू दिवसेंदिवस महाग होत चालली होत्या. यामध्ये सांगायचं झालं तर घरामध्ये वापरले जाणारे खाद्यतेलाचे दर देखील गगनाला भिडले होते.
या महागाईने सर्व सामन्यांचे महिन्याचे संपूर्ण नियोजन बिघडले होते. कारण कि घरातल्या सगळ्याच वस्तू या महाग होत चालल्या होत्या. सर्वसामान्य आणि गरीब वर्ग हा पूर्ण कोलमडला होता. त्यात सरकारने सगळ्याच पदार्थांवर लावलेला कर यामुळे आणखी महागाई वाढत चालली होती. त्यातच आता सर्वसामान्य लोकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळणार आहे. कारण खाद्यतेलांच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. जागतिक तेलाच्या किमतीमध्ये घात झाली आहे आणि त्याचा फायदा हा ग्राहकांना मिळावा यासाठी प्रयत्न केला गेला आहे.यासाठी खाद्यतेल उत्पादक कंपन्या (Edible Oil Producer Company) आणि प्रक्रियाकर्ते (Processors) तयार झाले आहेत. आणि यामुळे खाद्यतेलाच्या किमती 10-12 रुपयांनी कमी करण्यावर कंपन्यांमध्ये सहमती झाली असल्याचं समजतं.
खाद्यतेलांच्या जागतिक बाजारपेठेतल्या किमतींमध्ये घसरण झाली हे पाहून खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी 10-12 रुपयांनी घट करण्यास सहमती दर्शवली आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. उत्पादक कंपन्यांशी माहितीसह विस्तृत चर्चा झाल्याचंही त्या अधिकाऱ्याने नमूद केलं.
भारत हा खाद्यतेलांचा मोठा आयातदार देश आहे. भारत दोन तृतीयांश खाद्यतेल आयात करतो. गेल्या काही महिन्यांत रशिया-युक्रेनचं युद्ध, तसंच इंडोनेशियाकडून अन्य देशांना पाम तेल निर्यात करण्यावर घालण्यात आलेले निर्बंध यांमुळे खाद्यतेलांच्या किमतीत मोठी वाढ झालेली आपण पहिली आहे. इंडोनेशियाने पाम तेल निर्यातीवरचे निर्बंध हटवले, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमतीत घट झाली आहे. या घडामोडीमुळे खाद्यतेलांच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने अशी अपेक्षा व्यक्त केली, की वितरकांनीही तातडीने किमती कमी केल्या पाहिजे. जागतिक बाजारपेठेत झालेल्या घसरणीचा लाभ ग्राहकांना लगेच मिळेल. उत्पादक किंवा रिफायनर्स यांच्याकडून वितरकांसाठी किंमत घटवली जाते, तेव्हा ग्राहकांनाही वितरकांकडून त्याचा लाभ दिला गेला पाहिजे, असं सरकारचं म्हणणं आहे.
एकंदरीतच खाद्यतेलांच्या किमती तातडीने कमी झाल्या, तर सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. सध्या श्रावण महिना सुरू असून, पुढच्या महिन्यात गणपती आणि मग नवरात्रोत्सव आणि त्यानंतर दिवाळी असे सगळे सण लागोपाठ येतात. त्यामुळे खाद्यतेलाची मागणी वाढत जाते. अशा काळात किमतीत घट झाल्यास ग्राहकांना उपयुक्त ठरेल.