गोविंदांसाठी खुशखबर : आता मिळणार सरकारी नोकरी. पहा बातमी सविस्तर.

नव सरकार काय करेल याचा काही नियम नाही बुवा !
यंदाच्या दहीहंडी ही गोविंदासाठी खूप महत्त्वाचा असा शासकीय काला घेऊन आलेली आहे. तुम्ही म्हणाले एवढी गोडधोड बातमी नेमकी आहे तरी काय ?
यंदाचा दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचणार कारण गोविंदांसाठी ही खुशखबर आहे. शासकीय नोकरीत गोविंदांना स्थान मिळण्याची शक्यता अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
दहीहंडीच्या उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना शासकीय नोकरीत पाच टक्केच्या कोटातून नोकरीचा लाभ देता येईल असं मोठा विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला, तसेच दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन अपघात झाल्यास , विजय गोविंदाच्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आर्थिक योजना आखण्यासाठी मोठी मदत केली जाणार आहे.
दुर्दैवानं जर एखादा गोविंदा मृत्यूमुखी पडला तर त्याच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदत केली जाणार. त्याचबरोबर जखमीला पाच लाख रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, जर जबर मार लागला म्हणून गोविंदाचे शरीर निकामी झालं तर साडेसात लाख रुपये देण्याचा देखील बोलले जात आहे.
दहीहंडी उत्सवाचा क्रीडा प्रकार समावेश करून प्रो गोविंदा म्हणून स्पर्धा कराव्यात. राज्य शासनाकडून या स्पर्धा चालू केल्यानंतर बक्षीस राज्य शासनाकडून मिळेल त्याचप्रमाणे इतर खेळाप्रमाणे गोविंदांना देखील शासकीय नोकरीत स्थान मिळेल.
दहीहंडी 2022 गोविंदांसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे आता नव सरकार कशा पद्धतीने गोविंदांबद्दल योजना अवलंबत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.