खुशखबर : आता CNG व PNG च्या किमती कमी होणार ?
आपण पाहतो आहोत की गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या गाड्यांच्या इंधनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. आणि या कायम होणाऱ्या दरवाढीमुळे आपल्या जनसामान्य नागरिकांचा कल सीएनजी आणि पीएनजी वाहनांकडे वळला होता, मात्र लोकांचा या गॅस कडे कल वाढल्यामुळे वापर वाढला, जसा वापर वाढत गेला तसा उत्पादन क्षमता यावर परिणाम होत गेला. आणि त्यामुळे सीएनजी व पीएनजी गॅसच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपण ऐकली असेल. पण आता काळजी करण्याची काहीही कारण नाही. वाढत्या महागाईमुळे वैतागलेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे.
वाढत्या किमतींवर मोदी सरकार लवकरच त्यासाठी मोठा निर्णय सुद्धा घेणार आहे. लोकांना दिलासा मिळावा यासाठी सरकार मोठ्या कंपन्यांना व उद्योगांकडून काही प्रमाणात नैसर्गिक गॅस घेणार असून शहरात गॅस वितरण कंपन्यांना त्यांचे वाटप केले जाणार आहे. आणि यामुळे दोन्हीही गॅसच्या किमतीमध्ये कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने अधिसूचना देखील जारी केली आहे. आणि यामध्ये त्यांनी पूर्वीच्या आदेशात सुधारणा करण्याचा स्पष्ट सुद्धा केला आहे. सरकारकडून आता गॅस वितरण करणाऱ्या कंपन्यांना घरगुती उत्पादित गॅसचे वाटप वाढवले जाणार आहे. असं त्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आला आहे.
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड व मुंबईच्या महानगर गॅस लिमिटेड यांसारख्या शहरांमधील गॅस वितरण कंपन्यांकडे गॅसचे वाटप 17.5 दशलक्ष घनमीटर प्रतिदिन वरून 2.०88 दशलक्ष घनमीटर केले आहे. उपलब्ध तेच्या आधारे सीएनजी व पीएनजीच्या वाहतुकीसाठी केलेल्या वाटपाच्या आधारे शहर गॅस वितरक कंपन्यांना घरगुती गॅसचा पुरवठा केला जाईल.
सध्या शहरातील गॅस वितरण कंपन्यांना केल्या जाणाऱ्या वाटपामधून 83 टक्के मागणी पूर्ण केली जाते. व उर्वरित पुरवठ्यासाठी एलएनजी चढा दराने आयात केला जात आहे. त्यामुळे किमती वाढल्या होत्या. मात्र सरकारकडून वाटप वाढल्यानंतर या कंपन्या आता 94% मागणी पूर्ण करू शकतात असं सांगितलं जातं.
काही दिवसापूर्वीच मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो ६ रुपये व पीएनजीच्या दरात ४ रुपये प्रति युनिट वाढ झाली, त्यामुळे मुंबई सीएनजी ची किंमत 49. 40 पैसे प्रति किलो वरून 86 रुपये प्रति किलो इतकी झाली. दिल्लीतही इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड सीएनजी ४ रुपये प्रति किलो वाढ केल्याने त्याचे दर 75. 61 पैसे झाले आहेत.
एकंदरीत सध्या CNG ची मागणी वाढलेली असताना उत्पादन कमी होत आहे. आणि त्यामुळे बाहेरून गॅस जास्त दराने खरेदी करावा लागत आहे. आता गॅस उत्पादनासाठी इतर आणखी कंपन्यांना यात सहभागी केल्यामुळे उत्पादनात वाढ होईन आणि दोन्ही गॅस मधील भाव कमी होतील. असे मत तज्ञांनी मांडले आहे.