ग्रामसेवक कि पत्नीसेवक ? एका ग्रामसेवकाच्या आहेत चक्क एवढ्या बायका.
दैनंदिन जीवनामध्ये राजकारण हे गलिच्छ समाजकारण आहे असं समजलं जातं. आपण पाहतो की राजकारण करत असताना आमदार, खासदार, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी याबाबत वेगवेगळ्या बातम्या व्हायरल होताना पाहिल्या आहेत. तसेच एक घटना मध्यप्रदेश मधील सिंग्रोली जिल्ह्यातील देवसर तालुक्यामध्ये घडली आहे. या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एक अनोखा प्रकार करताना समोर आला आहे. ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायतीच्या सचिवाच्या तीन बायका आहेत असं समोर आलं. आणि या तीनही बायका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत
यामध्ये विशेष बाब म्हणजे अशी आहे की ग्रामसेवकाची एक पत्नी गावची सरपंच आहेत, त्याच सोबत दुसरी पत्नीही तिच्या विरोधात निवडणूक होती आणि महत्वाचं म्हणजे तिसरी पत्नी ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी उभी राहिली आहे व सध्या या ग्रामसेवकाची नियुक्ती दुसऱ्या गावात करण्यात आली आहे. तर ती त्याची त्याच्या गावांमध्ये नसून दुसऱ्या गावात आहे जेव्हा तो ग्रामसेवक स्वतःच्याच गावांमध्ये कार्यरत होता त्यावेळेस त्याची दोन नंबरची बायको ही सरपंच होती या ग्रामविकासाच्या कारणाचा खुलासा जेव्हा गटविकास अधिकारी यांनी केला त्यावेळी हे तपासामध्ये स्पष्ट झाली.
या ग्रामसेवकाने पंचायत गटविकास अधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे त्याच्या असणाऱ्या तीन बायका बद्दल त्यांनी कसलीही माहिती न देता शासनास फसवणूक केल्याचे समोर येत आहे. आणि आता या गटविकास अधिकाऱ्यांनी या सदरील ग्रामसेवकाला नोटीस पाठवली आहे जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या सुक्रम सिंह या व्यक्तीची एक नाही दोन नाही तर तीन बायका असल्याचे चौकशी मध्ये समोर आला आहे. आणि त्याच्या तीन बायका असल्यामुळे त्याच्याबद्दलची चर्चा हीच संपूर्ण पंचक्रोशी मध्ये चर्चा सर्वत्र पसरत आहे आता या निवडणुकीमध्ये पाहायचं आहे की नेमकी या तीनही बायकांपैकी कोणती बायको निवडून येते कि शासन सगळ्या बायकांना घरी बसवते.