” जीएसटी ” चा सर्वसामान्यांना दणका, या गोष्टी महागणार.
हा अत्यंत महत्वाची बातमी जी एस टी बद्दल आहे शिवाय वाढत्या महागाईनं होरपळणाऱ्या जनतेच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे चंदीगडमध्ये सत्तेचाळीसावा जीएसटी परिषदेच्या बैठकीला सुरुवात झाली या बैठकीच्या पहिल्याच दिवशी जीएसटी परिषदेने अनेक वस्तूंवरील कर सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या वस्तूंसाठी नागरिकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत दर सहा महिन्यांनी जीएसटी परिषदेची बैठक होत असते त्यानुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या बैठकीत पहिल्याच दिवशी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ते अगदी खालीलप्रमाणे;
जीएसटी परिषदेचे निर्णय,
- इलेक्ट्रिक वाहनांवर 5 टक्के ‘जीएसटी’ (बॅटरी लावलेली किंवा शिवाय)
- रोप-वे सेवेवर 18 टक्क्यांऐवजी फक्त 5 टक्के ‘जीएसटी’
- सांडपाणी प्रक्रिया केलेल्या पाण्यावर 18 टक्के ‘जीएसटी’ होता. आता सूट मिळेल.
- पॅकबंद दही, लस्सी व बटर मिल्कवर 5 टक्के ‘जीएसटी’
- फुगलेला तांदूळ, सपाट तांदूळ, पेरच्ड राइस, पापड, मध, अन्नधान्यावर 5 टक्के जीएसटी
- न भाजलेले कॉफी बीन्स, तसेच प्रक्रिया न केलेल्या ‘ग्रीन-टी’वर 0 ते 5 टक्के ‘जीएसटी’.
- गव्हाचा व तांदळाचा कोंडा 0 ते 5 टक्के ‘जीएसटी’
- टेलरिंग व टेक्सटाईलमधील इतर जॉब वर्कवर 5 ते 12 टक्के
- पॅकबंद मासे, पनीर, फ्रोजन भाजीपाला, लोणी, गहू, आटा, गुळ, कुरमुरे, सेंद्रीय खत, कंपोस्ट खतावर आता 5 टक्के ‘जीएसटी’..
- प्रिंटिंग राइटिंग/ ड्रॉइंग इंकवर 5 ते 12 टक्के
- एलईडी दिवे/दिवे आणि फिक्स्चरवर 12 ते 18 टक्के सूट
- सोलर वॉटर हिटर आणि सिस्टिमवरील जीएसटी 5 वरून 12 टक्के
- तयार आणि कंपोझिशन लेदरवर 5 ते 12 टक्के
- सरकारी कामाच्या कराराच्या पुरवठ्यावरील जीएसटी 5 वरून 12 टक्क्यांपर्यंत वाढीचा प्रस्ताव
- कट आणि पॉलिश हिऱ्यावरील जीएसटी 0.25 टक्क्यांवरून 1.5 टक्क्यांपर्यंत वाढ
जीएसटी परिषदेच्या नव्या स्लॅबनुसार हॉटेल रूम वरती 12 टक्के जीएसटी लागू होईल. त्यामुळे हॉटेलमध्ये राहणे महागणार आहे. शिवाय रुग्णालयाच्या रूमचे भाडे पाच हजारापेक्षा जास्त होणार आहे त्यावर ही पाच टक्के जीएसटी आकारला जाईल. यापूर्वी श्रेणी करमुक्त होती शिवाय बँकांकडून चेक वर 18% जीएसटी लागू असेल. नकाशा ॲक्टलासवर नकाशा असेल असं सांगण्यात आलं.
गेम प्रेमींसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे ऑनलाइन गेमिंग महागणार आहे. दुसऱ्या दिवशी क्रिप्टोकरेंसीसह चर्चा झाली राज्य सरकारकडून आकारला जाणारा तसेच 28 टक्के शाळेतील वस्तू सेवांचा आढावा घेतला जाणार आहे. कॅसिनो ऑनलाइन गेमिंग वरती 28 टक्के जीएसटी करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.