गारपीटने झोडपले ! कांदे, टोमॅटो, झेंडू, गहू, मिर्ची पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्याच्या डोळ्यात आले पाणी.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठारसह पिंपळगाव देपा परिसराला शनिवार( ता.१८)मार्च रोजी दुपारी उन्हाळ्यात अवकाळी पाऊस व गारपीटने चांगलेच झोडपले आहे.त्यामुळे कांदे, टोमॅटो, झेंडू, मिर्ची पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये गारांचा खच साचलेला पाहावयास मिळाला.
पठारभागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असून थोड्याफार प्रमाणात अवकाळी पाऊसही पडत आहे.आधीच शेतीमाला बाजारभाव नाही त्यात अवकाळी पावसाचे संकट त्यामुळे शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.मात्र शनिवारी दुपारी कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, पिंपळगाव देपा परिसराला अवकाळी पावसासह गारपीटने चांगलेच झोडपले आहे शेतांमध्ये मोठ्याप्रमाणात गारांचा खच साचला होता. सुदाम सखाराम गांजवे या शेतकर्याच्या टोमॅटो, झेंडू, मिर्ची व गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे अक्षरश: टोमॅटो व झेंडूच्या झाडांच्या फांद्या मोडल्या आहेत.त्याच बरोबर बाळासाहेब सुखदेव भागवत, लहानु कारभारी कराळे, भाऊसाहेब सुखदेव भागवत या शेतकर्यांसह आदी शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मोठ्या कष्टाने आम्ही पिक उभी केली मात्र गारपीटने ही सर्व पिक झोडपून काढली असल्याचेही या शेतकऱ्यांनी सांगितले आहे.पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कर्जुले पठार, चंदनापुरी घाटासह आजूबाजूच्या शेतकर्यांच्या शेतांमध्ये मोठ्याप्रमाणावर गारांचा खच साचलेला पाहावयास मिळाला.तर पहिल्यांदाच येवढ्या मोठ्याप्रमाणावर गारपीट झाली असल्याचे शेतकर्यांनी सांगीतले आहे.आधीच शेतीमालाला बाजारभाव नसल्याने अनेक शेतकर्यांनी उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवले असून काही शेतकर्यांनी मेंढ्याही सोडून दिल्या आहेत. अशी बिकट परिस्थितीती शेतकर्यांची झाली आहे
त्यातच आता उन्हाळ्यात अवकाळी पाऊस व गारपीटने शेतकर्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.त्यामुळे शेतकर्यांनी डोक्यालाच हात लावला आहे.परिसरातील मोठमोठी झाडेही गारपीटने अक्षरश: झोडपून काढली आहे झाडांचा पालाही गळून गेला असून काही झाडांच्या फांद्याही मोडल्या आहेत.तर झाडांखालीही गारांचा खच साचलेला पाहावयास मिळाला आहे.