मंडळाच्या पथकात त्याने रात्री उशिरापर्यंत सराव केला आणि घरी येऊन उचलले टोकाचे पाऊल, पहा सविस्तर.
धुमधडाक्यात गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र घरोघरी गणेश मुर्त्या स्थापन झाल्यात काही ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळ देखील आहेत आणि यंदाच्या वर्षी या गणेशोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचला. सर्वत्र ढोल ताशाच्या गजरात गणेश मुर्त्या विराजमान झाल्यात. अश्यातच एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे.
हरसुल परिसरातील गणेश मंडळाच्या ढोल पथकात रात्री उशिरापर्यंत सराव केल्यानंतर घरी आलेल्या अठरा वर्षाच्या युवकांन खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुमित कोतकर वय वर्ष १८ असे या तरुणाचे नाव आहे. सुमित नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता त्याला तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता.
त्याचे वडील माती काम करत होते तर आई हॉटेलमध्ये कामाला होती. हा तरुण परिसरातील गणेश मंडळात ढोल वाजवण्याचा सराव करण्यासाठी सायंकाळी घराच्या बाहेर पडला तेथून घरी आल्यानंतर लगबग अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांन घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्यांना हे दृश्य दिसतात त्यांनी घाटे रुग्णालय त्याला उपचारासाठी दाखल केला मात्र पहाटे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केला.
त्यांनी आत्महत्या कशामुळे केली याचा अजूनही उलघडा झाला नाहीये. त्याच्या पाच्छात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे. पाच वर्षांपूर्वी बहिणीने देखील आत्महत्या केली होती.त्याच्या मोठ्या बहिणीने देखील पाच वर्षांपूर्वी म्हणजेच ती सतरा वर्षाचे असताना जाळून घेत आत्महत्या केली होती अशी माहिती नातेवाईकांनी दिली. 17 ते 18 या वयातच बहिण – भावाने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला.