मालवणमध्ये फिरायला गेला अन माघारी फिरताना काळाने घातला घाला वाचा बातमी सविस्तर..
ओरोस येथे राजस्थान मधील वास्तव्यात असलेले कामगार मालवण फिरण्यासाठी गेले होते.मात्र माघारी फिरताना त्यांचा भीषण अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टर आणि दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ,मालवण कुंभारमाठ येथे चारचाकीला ओव्हरेटक करताना दुचाकीचा अपघातात झाल्याची घटना आज सायंकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात मुरारी जाटव (२५ मूळ रा. राजस्थान) व देसवीर जाटव (२५ मूळ रा. राजस्थान) हे दोघे गंभीररित्या जखमी झाले.
वाहतूक पोलीसांच्या मदतीने दोघा जखमींना रूग्णवाहिकेने येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु मुरारी जाटव याचा मृत्यू झाल्याचे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. तर देसवीर जाटव याच्यावर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. ओरोस येथे राजस्थान येथील कामगार वास्तव्यास आहेत. यात आज मुरारी जाटव, देसवीर जाटव, अरूण जाटव, सोनू जाटव हे चौघे दुचाकीने येथे फिरण्यासाठी आले होते.
सायंकाळी हे चारही युवक मालवणहून ओरोसला जात होते. सायंकाळी ३.४५ च्या सुमारास दुचाकीवरील मुरारी जाटव व देसवीर जाटव हे कुंभारमाठ येथे आले असता चारचाकीला ओव्हरेटक करण्याच्या प्रयत्नात रस्त्यावर पडून गंभीररित्या जखमी झाले. यामध्ये मुरारी जाटव याच्या डोक्याला गंभीररित्या दुखापत झाली तर देसवीरही जखमी झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस दिपक तारी, महेंद्र देऊलकर, नितीन शेटये, अविनाश गायतोंडे यांनी स्थानिकांच्या मदतीने मुरारी जाटव व देसवीर जाटव यांना रुग्णवाहिकेने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु मुरारी जाटव याचा मृत्यू झाल्याचे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, पोलीस कर्मचारी महादेव घागरे यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.