हृदयद्रावक: पुतणीने काकाकडे आंबा मागितला, काकाने मात्र..

लहान मुलं काही ना काही हट्ट करत राहतात. आणि लहान मुलांचे हट्ट पुरवणे हे कुटुंबीयांचं काम असतं. मात्र लहान मुलांचा तोच हट्ट कधीकधी याच मुलांच्या जीवावरती देखील देतो. आपल्या मित्र-मैत्रिणींकडे असणारी गोष्ट आपल्याला हवीच असते, असे या लहान मुलांचे म्हणणं असतं. अजाणतेपणाने ते हे हट्ट करत असतात बऱ्याचदा लाडवलेल्या या मुलांना त्यांच्या हट्ट पुरवणं हे पालकांना जिगरीच बनत. मात्र बऱ्याचदा आपली ही पाल्य लाडाची असल्यामुळे हट्ट पुरवले जातात.
मात्र माणुसकीला काळीमा फासणारी घटना उत्तर प्रदेश मध्ये घडली आहे. शामली या ठिकाणाहून एक बातमी समोर येते. एका व्यक्तीने आपल्या पाच वर्षाच्या पुतणीची हत्या केली आहे. ती जेवणामध्ये आंबे मागत होती हट्ट करत होती. आणि त्याच्याच रागातून या काकांना त्या पुतणीचा खून केला. 19 जुलैला कंदाला परिसरात ही घटना घडली आहे कुर्शीद यांची मुलगी खैरूनिशा ही बेपत्ता झाली होती . तिला शेवटचं जवळ राहणारे तिचे काका अमरउद्दीन यांच्यासोबत पाहिलं होतं. संशयाच्या आधारे पीडित कुटुंबीयांनी अमरुद्दीन वरती गुन्हा दाखलही केला.
या घटनेत असं घडलं. पीडित कुर्शीद आणि अमरुद्दीन यांचे घर जवळ आहे. दोघांचे कुटुंबीय एकमेकांच्या घरी येणं जाणं ठेवतात दरम्यान कुर्शीद यांची मुलगी खैरूनी शाम ही अमरुद्दीन यांच्या घरी पोहोचली. तेव्हा तो जेवण करत होता. तो आंबे खात होता हे पाहून त्या मुलीनेही आंबे मागायला सुरुवात केली. मात्र अमरुद्दीन ने तिला आंबा देण्यास नकार दिला. त्यानंतर चिमुकली पुन्हा खाण्याचा हट्ट करू लागली. हे पाहून तो भडकला मुलीच्या हट्टीपणामुळे चिडलेल्या आरोपीने आधी डोक्यात रोड न वार केला, त्यानंतर शस्त्राने तिचा गळा चिरला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला मृत्यू नंतर आरोपींना त्या मुलीचा मृतदेह एका गोणीत भरून ठेवला.
तपास दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या घरातून मुलीचा मृतदेह जप्त केला. आपली मुलगी बेपत्ता झाली म्हणून वडील तिचा शोधा शोध घेत होते, मात्र गावकऱ्यांसोबत मिळून शोध केला असता तो अमरउद्दीन यांच्या घरी पोहोचला. पोलिसांना संशय येत असताना तात्काळ पळ काढला. मात्र तरी देखील पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात पाठवला. त्यासोबत त्याच्याकडून खुनात वापरलेल्या चाकू लोखंडी रोड देखील जप्त करण्यात आला.