हृदयद्रावक : पोटच्या मुलीने व सुनेने आई सोबत पहा काय केले पाहा…
समाजात कधी कुठे की घडेल कोण काय करेल याचा नेम नाही तुमचा विश्वास बसणार नाही अशी घटना घडली आहे . सून ही परकी असते अस जनमत आहे मात्र आपली पोटची मुलगी अस वागू शकते यावर विश्वास बसत नाही .नात्यांना काळिमा फासणारी घटना घडली आहे .
चंद्रपूर जिल्यातील सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी या ठिकाणी एक भयानक घटना घडली ,पोटच्या मुलीने अन् सूनेने हत्या केल्याची घटना घडली उ या घटनेने एकच खळबळ उडाली. ही हत्या शेतीचा वादावरून झाली. पोलिसांनी वंदना विनोद खाठे (वय ३५) आणि चंद्रकला प्रभाकर सावसाकडे (वय ४०) या दोघींना अटक केली आहे.
तानाबाई महादेव सावसाकडे (वय ६५) या सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी (नलेश्वर) येथे राहत होत्या. तानाबाई सावसाकडे यांचा ४ ऑक्टोबरला मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या मोठ्या मुलीला देण्यात आली. आई मरण पावली म्हणून मोठी मुलगी रंजना रामेश्वर सोनवणे, तिचे पती बल्लारपूरहून अंत्यविधीसाठी मोहाळीत आले. अंत्यविधीवेछी मोठ्या मुलीला आणि तिच्या पतीला संशय आला होता. पण ते त्यावेळी बोलले नाही.
मोठ्या मुलीने सिंदेवाही पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली,त्याआधारे पोलिसांनी मृत महिलेची लहान मुलगी, सुनेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत दोघींनीही तानाबाई सावसाकडे यांच्या तोंडावर व नाकावर चादर दाबून खून केल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी मुलगी वंदना खाटे आणि सून चंद्रकला सावसाकडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.या घटनने नात्यावरचा विश्वास उडाला अस बोल जात आहे .