हृदयद्रावक : आश्रम शाळेतील १६ वर्षीय मुलीने उचलले नको ते पाऊल.

महाराष्ट्रात प्रत्येकाला शिक्षण मिळावं यासाठी सर्व शिक्षण अभियान राबवलं जातं. वाड्या वस्त्यांवरील प्रत्येकाला शिक्षण मिळावं यासाठी आश्रम शाळा चालवल्या जातात. आदिवासी भागातही सर्वजण सुशिक्षित व्हावेत यासाठी आदिवासी आश्रम शाळा मोठ्या प्रमाणात आहेत. नाशिक मध्ये देखील अशा आदिवासी आश्रम शाळा आहेत. मात्र याच आश्रम शाळांमध्ये नेमके चाललय काय हाच सवाल आता उपस्थित करत आहे.
कारण आधी काही दिवसांपूर्वीच आश्रम शाळेमधील विद्यार्थिनीला मासिक पाळी आली म्हणून वृक्षारोपण करण्यास मनाई केली होती. ही घटना ताजी असतानाच आश्रम शाळेत एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.
जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळेत ही घटना घडली आहे. या भारती बेंडकोळी वय वर्ष 16 असा आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पहाटेच्या सुमारास भारतीने आश्रम शाळेतील असलेल्या पंखाला अडकवण्याचा हुकाला दोरी बांधली आणि गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शाळेच्या वस्तीगृहातील खोलीत गळफास घेतला त्यामुळे एकच खळबळ उडाली. भारतीने इतका टोकाचं पाऊल का उचलले याबद्दल अद्यापही कुठलाच कारण स्पष्ट नाही सदरील माहिती मिळावी यासाठी ही चौकशी सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच हरसुल ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला तेव्हा आत्महत्या केली असे समोर आले. तिने आत्महत्या केली तेव्हा मुख्यालयातील शिक्षक हे उपस्थित नव्हते या प्रकाराची चौकशी करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली. या आदिवासी आश्रम शाळेत एक विद्यार्थिनी आत्महत्या केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जातोय. गळफास घेऊन आपले जीवन संपवलं याबद्दल अद्याप कुठलाही ठोस कारण माहित नाही. पोलीस निरीक्षक विशाल जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस सध्या करत आहेत.