हृदयद्रावक : 1000 रुपयांसाठी गर्भवती महिलेसोबत पहा या रुग्णवाहिकेच्या चालकाने काय केले ? सविस्तर.
समाजात फिरताना आपल्याला जर कधी गर्भवती महिला दिसली तर अनेक जण तिच्यासोबत खूप आदराने प्रेमाने वागतात. कारण तिच्या पोटामध्ये एक बाळ असत तिची काळजी घेणं हे प्रत्येकाला आपलं काम वाटत असतं. अगदी प्रवास करताना तिला सीट उपलब्ध करून देणे, एखाद्या रांगेत उभे असताना तिला पुढचा नंबर देन किंवा तिची तब्येत खराब असताना तिची विचारपूस करणं असं अनेक वेळा घडत असतं.
बऱ्याचदा लोक असेही म्हणतात, तुझ्यासाठी नाही पण तुझ्या बाळासाठी आम्ही तुला विचारत आहोत कारण गर्भवती महिलेची काळजी घेणं हे तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. आई पण हे निसर्गाने दिलेलं खूप मोठे देण असतं. निर्मितीतला हा महत्त्वाचा क्षण म्हणजेच गर्भावस्था असते. मात्र याच गर्भ अवस्थेत एका महिलेला एका व्यक्तीने जंगलात सोडलं. एक हजार रुपयासाठी या माणसाची माणुसकी मेली होती कि काय असा प्रश्न पडतो. या माणसाने गर्भवती महिलेला रुग्णालयात न पोहोचवता जंगलात सोडून दिला.
हा प्रकार उत्तर प्रदेशमधील हमीरपुर जिल्ह्यात घडला. केवळ एक हजार रुपयासाठी वेदनेने विव्हळत असलेल्या गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेच्या चालकाने रस्त्यात उतरवून दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रुग्णवाहिकेच्या चालकावरती पुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासन मात्र पुरता हादरला आहे. रेखा असं 24 वर्षे या महिलेचे नाव असून तिच्या कुटुंबीयांनी 102 या क्रमांकावर ती कॉल करून रुग्णवाहिकेला बोलवलं होतं.
रुग्णवाहिका आल्यानंतर रेखाला सरकार रुग्णालयात नेण्यात येत होतं मात्र अर्धा रस्त्यात येताच पांढरी गावाकडे रुग्णवाहिका थांबवून महिलेच्या कुटुंबीयांकडे हजार रुपयाची मागणी करण्यात आली पैसे देण्यास नकार दिला तर गर्भवती महिला आणि कुटुंबीयांना जंगलात मध्येच सोडून देण्यात आलं. अशा गर्भवती महिला सोबत असलेल्या आशा सेविकांना न जुमानता गाडीतून खाली उतरवून देण्यात आलं.
ही महिला प्रसूती वेदनेने किंचाळत होती जंगलातील रस्त्यावर उतरवून देऊन ती रुग्णवाहिका निघून गेली. त्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेचा आणि कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभाराचा तीव्र निषेध केला. याप्रकरणी आंदोलनाचा पवित्रा देखील घेतला तर प्रशासनाला ही खबर मिळताच त्या ठिकाणी दुसरी गाडी पाठवून आणि त्यानंतर रुग्णवाहिकेतून या महिलेला सरकारी रुग्णालयात आणण्यात आलं. या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला, मात्र या महिलेचा रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास होता तो अत्यंत हृदय द्रावक होता एक हजारासाठी जर रुग्णवाहिकेचा चालक या पद्धतीने वागत असेल तर खऱ्या अर्थाने आता माणुसकीच शिल्लक राहिली नाहीये हेच आपल्याला पाहायला मिळते.