अवकाळी पावसामूळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भिलदरी परिसरात पीक आडवे.
:भिलदरी (ता कन्नड ) परिसरात रविवार (ता 5 ) रात्रीला अवकाळी पावसामूळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गहू मकाच्या पिक हाताशी आलेले असताना अचानक वादळी वाऱ्याच्या पावसाने पीक आडवे केले आहे. यामुळे शेतकऱ्याला मोठा फड़का बसला आहे .शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही त्यातच शेतकर्यावर निसर्ग
बरसल्याने शेतकरी हावलदिल झाला आहे.
शेतकऱ्यांनी व्याजाने बी -बियाणे आणून मोठा खर्च केला होता .अता सततच्या संकटाने शेतकरी मेटाकूटीस आला आहे. दुकानदारांचे पैसे कसे द्यायचे या चितेंने ग्रासला आहे. यावेळी झालेल्या पावसामुळे नुकसानीचा आदी शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
नकुल सुदाम महेर ग.न 178,प्रभू कपूर महेर 310,जयलाल सुपडसिंग बम्हनावत ग.न.256, घासीराम छोटेराम कायटे, यांच्यासह गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्या अशी मागणी गावातील सरपंच शोभाबाई कोटवाळे उपसरपंच विजय वैष्णव पोलीस पाटील दिलीप माहेर ग्रामपंचायत सदस्य जयलाल भाऊ, गांधी गोटवाल, नारायण कवाळ चरण सुलाने चेअरमन प्रताप कोठवाळे, चंपालाल राजपूत राजू राजपूत भगवान राजपूत यांनी केली आहे.