यापुढे यतिमखाना मधील अनाथ मुलांची जबाबदारी माझी राहणार – खा. निलेश लंके
टीम हंगर वॉरियर्सच्या वतीने यतीमखाना मधील 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; मोहंमद पैगंबर जयंतीचा उपक्रम.
अहमदनगर (प्रतिनिधी) –
निराधार विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या यतिमखाना संस्थेचा सभासद म्हणून जबाबदारी सांभाळणार असून, यापुढे यतिमखाना मधील अनाथ मुलांची जबाबदारी माझी राहणार असल्याची भावना खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली.
मोहंमद पैगंबर जयंतीनिमित्त शहरातील यतीमखाना मधील 300 विद्यार्थ्यांना टीम हंगर वॉरियर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप खासदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी हंगर वॉरियर्सचे ॲड.नूमेर शेख, अफ्फान सोलापूरे, दानिश इनामदार, सलमान सय्यद, फक्रुद्दीन हकीमजीवाला, फुरकान शेख, साहिल इनामदार, मोईन शेख, माझ खान, बंटी शेख, अक्रम शेख, अदनान तांबटकर, यतिमखाना ट्रस्टचे ॲड. फारूक बिलाल, अलीमशेठ हुंडेकरी, हाजी निजाम बागवान, नूरमोहंमद पठाण, रफिक मुन्शी, अन्सार शेख आदी उपस्थित होते.
पुढे लंके म्हणाले की, संस्थेला ज्या वेळी मदत लागेल, तेंव्हा आम्ही सोबत राहणार आहे. देव हा मंदिर-मशिदीमध्ये नसून, चालत्या बोलत्या अनाथ मुलांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय बूट, वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.