गुन्हेगारी

विवाहित भाच्यावर जडलं तिचं प्रेम; महिलेसोबत गावकऱ्यांनी पहा कशी केली आयुष्यभराची गेम.

समाजात काही अश्या घटना घडतात ज्यामुळे आपली संस्कृती ढासळत आहे , भारताच्या संस्कृतीचा डंका सातासमुद्रापार आहे . मात्र सध्या काळात प्रेमप्रकरण होतात ज्यात अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत .यात खून ,मारामारी होत आहेत , गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी वाढली आहे. अनैतिक संबंध, प्रेमप्रकरणं या गोष्टींमुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे.पश्चिम बंगालमध्ये मालदा येथे विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसंच या महिलेचे केस कापून तिची धिंडदेखील काढण्यात आली. यामुळे पुरतुली परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

मालदा येथे विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून एका महिलेचे केस कापून तिची धिंड काढण्यात आली. तसंच तिला मारहाणदेखील करण्यात आली होती कारण विवाहित भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप या महिलेवर आहे. या विवाहित भाच्याने काही दिवसांपूर्वी नैराश्यातून आत्महत्या केली आहे. युवकाने आत्महत्या केल्यानंतर ही महिला फरार झाली होती. आत्महत्या केलेल्या युवकाची पत्नी आणि कुटुंबीयांनी या महिलेला पकडलं. पतीच्या निधनामुळे संतापलेल्या पत्नीने आणि कुटुंबीयांनी या महिलेला बेदम मारहाण केली. तसंच तिचे केस कापून तिची धिंड काढली. या घटनेची माहिती मिळताच इंग्लिश बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेला ताब्यात घेतलं आहे.

मृत युवकाच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, `कॉलनीतल्या सविता नावाच्या महिलेसोबत माझ्या पतीचे अनैतिक संबंध होते. परिसरातल्या नागरिकांना याविषयी माहिती झालं होतं. कॉलनीतल्या माणसांना बोलावून याविषयी सांगितलं होतं. सर्वांनी समजावूनही ही महिला माझ्या पतीसोबत संबंध ठेवू इच्छित होती. त्यामुळे आमच्यात वादही झाला होता. दरम्यान, या आठवड्यात मंगळवारी माझा पती कामावर गेला आणि त्यानं अ‍ॅसिड प्यायल्याची बातमी मिळाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ती महिला फरार होण्याच्या प्रयत्नात होती; तिला पकडल.

आमचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. माझा पती ड्रायव्हर होता. आम्हाला दोन मुलं आहेत. परंतु, त्याचे सवितासोबत अनैतिक संबंध होते. याला मी विरोध केला आणि माझ्या पतीसोबत संबंध ठेवू नको असं सांगितलं; पण तिनं ऐकलं नाही. हळूहळू माझा पती आणि सविताच्या संबंधाविषयीची माहिती सर्वांनाना झाली होती, असं युवकाच्या पत्नीनं सांगितलं.या महिलेला पडकल्यानंतर युवकाची पत्नी आणि कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण केली, तिचे केस कापून परिसरात तिची धिंड काढली. सध्या या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास सुरू आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!