डि – हायड्रेशन पासून बचावण्यासाठी काही घरगुती टिस्प खालील प्रमाणे.
अनेक महान कवींनी बदलत्या ऋतूंच्या वैभवाची प्रशंसा केली आहे – उन्हाळ्यात चमकणारा सूर्यप्रकाश, हिवाळ्यातल्या थंड व शांत संध्याकाळ, आणि पावसाळ्यात टप टप पडणाऱ्या पावसाच्या थेंबांची मजा. सुदैवाने आपण सध्या ज्या प्रकारचे हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचे संकट अनुभवत आहोत त्यापासून ते वाचले.
आपण वातानुकूलित वातावरणामध्ये स्वतःला डांबून ठेवतो, महाग लिंबांचे सरबत बनवतो, योग्य एसपीएफसह असलेल्या सनस्क्रीनचा शोध घेतो आणि देशातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित होतो अशा कोळशाच्या टंचाईचा प्रश्न सरकार कसा सोडवणार याची वाट पाहतो. पण आपल्या आरोग्याची काळजी घेणे आणि स्वतःला हायड्रेट ठेवणे म्हणजेच स्वतःच्या शरीरातील पाणी कमी न होऊन देण्याची काळजी घेणे ही आपण सध्या करू शकत असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
तज्ज्ञांच्या मते डिहायड्रेशनच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर वैद्यकीय समस्या उद्भवू शकतात. माणसाच्या शरीराचा एक तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला असतो. कोरड्या आणि दमट हवामानात भरपूर घाम आल्याने पाणी आणि मीठ यांचे संतुलन बिघडते. परिणामी, शरीराचे सामान्य तापमान राखण्यासाठी शरीराला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असते. एनएचएस नुसार जेव्हा शरीरातील पाणी कमी होते तेव्हा पुढील लक्षणे दिसतात: तहान लागणे, गडद पिवळा आणि तीव्र वास असलेली लघवी, चक्कर येणे किंवा डोके हलके झाल्यासारखे वाटणे, थकवा जाणवणे, तोंड, ओठ आणि डोळे कोरडे पडणे, दिवसाला ४ वेळे पेक्षाही कमी, इतकी लघवी कमी होणे.
बदलत्या हवामानामुळे होणारे निर्जलीकरण दूर करण्यासाठी टिपा :
- हायड्रेटिंग फळे आणि भाज्यांनी तुमची डिश भरा: हायड्रेटिंग फळे आणि भाज्या निर्जलीकरणाचा सामना करण्यासाठी आदर्श आहेत. वर्षभर आपल्याला उपलब्ध असलेल्या फळे आणि भाज्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात असते. पीच, कलिंगड, स्ट्रॉबेरी, अननस आणि कॅनटालूप ही पाण्याने समृद्ध फळांची उदाहरणे आहेत. ओवा, टोमॅटो, मुळा आणि काकडी या सर्व पाण्याने समृद्ध असलेल्या भाज्या आहेत. त्या तुम्ही खाल्याच पाहिजेत. तेलकट आणि मसालेदार पदार्थांच्या जागी दिवसभर पाणीयुक्त फळे आणि भाज्या घेणे ही निर्जलीकरण टाळण्यासाठी सर्वात चांगली पद्धत आहे.
- इलेक्ट्रोलाइट्ससह रिचार्ज: बहुतेक लोक जेव्हा त्यांच्या शरीरात निर्जलीकरण होते तेव्हा फळांचा रस किंवा एनर्जी ड्रिंक घेणे पुरेसे आहे असे समजून तेवढेच घेतात. तथापि, त्यांना हे समजत नाही की ते शरीरातील आवश्यक क्षार आणि द्रव गमावत आहेत ज्याची जागा कोणतेही फळ पेय घेऊ शकत नाही. जे पेय आपल्या शरीराला रिहायड्रेट, रिचार्ज करते आणि सहजतेने आपण आपले काम चालू ठेऊ शकतो असे पेय गरजेचे असते. डिहायड्रेशनचा उपचार ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन शीतपेयांसह केला जातो. आघाडीचे ओटीसी असलेल्या अमृतांजन हेल्थ केअरचे फ्रूटनिक इलेक्ट्रो+ यावर प्रभावी आहे कारण ते श्रम किंवा निर्जलीकरणामुळे गमावलेले क्षार आणि द्रव पुनर्प्राप्त करण्यात मदत करते. त्यात साखर, ग्लुकोज, सोडियम आणि पोटॅशियमचे योग्य मिश्रण असते तसेच त्यामुळे गमावलेले द्रवपदार्थ शरीराला परत मिळवून देण्यात मदत होते. फ्रूटनिक इलेक्ट्रो+ हे सफरचंद फळांचे एक नैसर्गिक पेय आहे जे ऊर्जा वाढवते, इलेक्ट्रोलाइट्सची कमी पूर्ण करते आणि व्हिटॅमिन सी देते.अती परिश्रम, उष्माघात आणि त्यामुळे येणारा ताण आणि विविध प्रकारच्या खेळांमुळे झालेल्या निर्जलीकरणातून बरे होण्यासाठी हे उत्तम आहे. ग्रामीण भागात निर्जलीकरणाचा सामना करण्यासाठी कोणत्याही सरकारी आरोग्य केंद्रावर मोफत ओआरएस सोल्यूशन किंवा वैद्यकीय उपचार मिळू शकतात.
- सोड्याच्या ऐवजी फळांचा रस घ्या: जर तुम्हाला वाटत असेल की सॉफ्ट ड्रिंकचा कॅन किंवा सोडा तुमची तहान भागवेल तर एरवी तुम्ही कदाचीत चुकीचे ठरू शकत नाही. पण जेव्हा हायड्रेशनचा प्रश्न येतो तेव्हा सोडा, कॉफी, मद्य आणि चहा निरुपयोगी असतात. खरं तर, ते तुमच्या शरीराच्या पाण्याचं प्रमाण कमी करू शकतात. परिणामी, वर्षभर ही पेये टाळण्याचा सल्ला दिला जातो. तुमचे पेय उत्साहवर्धक आणि ताजेतवाने बनवण्यासाठी अमृतांजन हेल्थ केअरच्या पोतडीतील फ्रूटनिकसारखे फ्लेवर्ड पाणी किंवा फळांचे रस वापरून पहा. संत्र आणि सफरचंदच्या फ्लेवर्समध्ये येणारा फ्रूटनिक ज्यूस नैसर्गिक फळांच्या चांगल्या गुणांनी युक्त आहे ज्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. कडक उन्हात हायड्रेट राहण्यासाठी ती आवश्यक असतात.
- अल्कोहोल टाळा: अल्कोहोल मूत्रवर्धक म्हणून कार्य करते. यामुळे तुमचे शरीर तुमच्या रक्तातील द्रवपदार्थ तुमच्या मूत्रपिंड, मूत्रमार्ग आणि मूत्राशयाद्वारे इतर द्रवपदार्थांच्या तुलनेत खूप वेगाने काढून टाकते. तुम्ही अल्कोहोल घेत असताना पुरेसे पाणी न पिल्यास तुमच्या शरीरातील पाणी लवकर कमी होऊ शकते. सर्व ऋतूंमध्ये स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी अल्कोहोलचे सेवन टाळण्याचा किंवा कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
- हायड्रेटेड रहा, पाणी अत्यावश्यक आहे. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुमचे पाणी पिण्याचे प्रमाण दुप्पट होणे महत्त्वाचे आहे. तुमच्या वर्कआउटच्या किमान चार तास आधी भरपूर पाणी प्या. व्यायाम करताना दर १०-१५ मिनिटांनी स्वतःला हायड्रेट करा. तुम्हाला तहान लागली नसली तरीही दुपारी २ वाजेपर्यंत १.५ लिटर पाणी प्या. वारंवार तहान लागणे हे डिहायड्रेशन सूचित करते. पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला पाणी सहज उपलब्ध होईल. तुम्हाला जास्त पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी तुम्ही अॅप देखील वापरू शकता.