याठिकाणी मिळतात फेमस ” 40 गद्दार ” अन ” 50 खोके एकदम ओके ” जेवणाच्या थाळ्या; पहा बातमी सविस्तर.
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. ही चर्चा आता जेवणाच्या थाळीपर्यंत पोहोचली आहे. कारण सोलापुरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दोन थाळ्या तयार केल्या आहेत. या थाळांची नावे ऐकून तुमच्या भुवया उंच होणार आहेत कारण मार्केटिंग साठी कोण काय फंडा वापरेल सांगता येत नाही. मात्र शिवसेनेचा पदाधिकाऱ्यांनी मार्केटमध्ये एक नवीन थाळी आणली आहे. या दोन ताळ्या ग्राहकांसाठी आता अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर ठरणार आहेत.
या थाळीचं नाव ऐकलं तर नक्कीच तुम्हाला उत्सुकता निर्माण होईल, कारण या थाळी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीने प्रेरित झालेले आहेत. यातील एक थाळीचे नाव आहे ” 40 गद्दार ” तर दुसऱ्या थाळीचे नाव आहे ” पन्नास खोके एकदम ओके ” यातील ” 40 गद्दार ही शाकाहारी ” तर ” 50 खोके एकदम ओके ही मांसाहारी ” थाळी आहे.
पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे हॉटेल शिवम या ठिकाणी भन्नाट नावाच्या दोन टाळ्या भेटत आहेत. 40 गद्दार ही थाळी ४० रुपयांना या तर 50 खोके एकदम ओके ही मांसाहारी थाळी फक्त ५० रुपयात त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. राज्यामध्ये आतापर्यंत अनेकदा होऊन गेलेल्या बुलेट थाळी असेल बाहुबली थाळी असेल अशा अनेक प्रसिद्ध थाळ्या आहेत मात्र सध्याचे 40 गद्दार आणि ५० खोके एकदम ओके ही थाळी प्रत्येकाला आवडेल, रुचेल आणि त्याचा प्रतिसाद कसा मिळतोय याकडेच आता सर्वांचं लक्ष लागले आहे.