प्रेम हे प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी होत असतं. तरुण वयात या प्रेमाच्या अनेक व्याख्या असतात. महाविद्यालयीन युगात शाळकरी युगात अनेकांना प्रेम होतच. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असे या प्रेमाला आधुनिक नाव देखील आहे. अनेकांना आपल्या जोडीदारांना दुसऱ्या कोणासोबत जवळीक वाढवलेली आवडत नाही. विशेषता महिला याबाबत अगदीच इमोशनल असतात. नवरा असो वा बॉयफ्रेंड दुसऱ्या महिलेसोबत, मुलीसोबत दिसला की त्यांचा संताप होतो.
आणि मग त्या दुसऱ्या महिलेला/ मुलीला बिलकुल सोडत नाहीत. आपल्या आयुष्यात असलेल्या त्या दुसऱ्या महिलेवरच सूड उगवणारी बायको किंवा गर्लफ्रेंड तुम्ही फिल्म मध्ये बऱ्याचदा पाहिली असेल, पण प्रत्यक्ष देखील असाच एक व्हिडिओ समोर येतोय. एकाच बॉयफ्रेंड साठी दोन गर्लफ्रेंड आपापसात भिडल्या आहेत. या दोघींनी बऱ्याच राडा घातला, एकमेकीच्या जीवावरती उठल्यात. दोन तरुणी रस्त्यांमध्ये एकमेकीशी फाईट करताना दिसतात.
दोघींनी एकमेकांना धरलय, एकमेकांचे केस खेचत आहेत, झिंझ्या उपटत आहेत. त्यानंतर दोघीही एकमेकांना सटासट कानाखाली मारताना दिसत आहेत. त्यानंतर दोघेही एकमेकींना खाली पाडत आहेत तरुणी या दोघांमध्ये मध्यस्थी करत त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करते. पण दोघीही ऐकत नाहीत. तिथंच आणखी एक तरुण आहे, त्याने तरुणींची फायटिंग पाहून इतका घाबरला आहे की, त्यांच्यात पडण्याची त्याची हिंमतही होत नाही. तिथं असलेल्या लोकांना तो बोलावतो आणि यांना थांबवा असं सांगताना दिसतो.
त्याच्या आजूबाजूला तरुण-तरुणी दिसत आहे. सुरुवातीला ती तरुणी या दोघांमध्ये मध्यस्थी करत त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करते. पण दोघीही ऐकत नाहीत. दोघींपैकी एकही मागे हटत नाही. बराच वेळ दोघी अशाच लढत राहतात. थोड्या वेळाने आपोआप शांत होतात आणि लढाई थांबवून भांडण थांबताना दिसते. त्यानंतर आपापल्या मार्गाने निघून जातात. ट्विटर अकाऊंटवर @Sonu Sharma याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बिहारमधील आहे. स्थानिकांनी सांगितल्यानुसार एका बॉयफ्रेंडसाठी या दोघी तरुणी लढत होत्या, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.