अरे बाप रे : नगरमध्ये ‘ या ‘ ठिकाणी आढळला उत्तेजित करणाऱ्या गोळ्यांचा साठा.

वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणारी ही घटना आहे. ही घटना राहुरी तालुकामध्ये घडली आहे. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर रोड वरील एका गोदामात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक औषध गोळ्या सापडल्या आहेत.
पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने बारागाव नांदूर रोड येथील या गोदामावर छापा टाकला यामध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे असणाऱ्या औषध गोळ्यांचा साठा सापडला आहे. तब्बल एक ते दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
उत्तेजित होण्याच्या गोळ्या, अवैद्य गर्भपाताच्या गोळ्या, औषध, चरस, अफू, सदृश्य असल्याचे देखील समजते. नश्या येणाऱ्या गोळ्यांचे सेवन ने सध्याची तरुण पिढी बरबाद होताना दिसत आहे. आणि याचं प्रमाण देखील वाढला आहे.
गावोगावी तरुण सदर गोळ्या घेत असल्याचे देखील समजत आहे, तरी या गोळ्यांच्या अतिसेवनाने काही जण दगावत देखील आहेत आणि त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम देखील होतो व गावोगावी गोळ्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती समोर येतेय.
पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईचा सर्व स्तरातून स्वागत केले जाते साठवणूक करणाऱ्या मास्तर माहितीसह ज्यांना विक्रीसाठी पुरवठा केला जातो हे त्या मेडिकल दुकानांवर ती कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे मागणी आता जोर धरू लागली अधिकारी यांच्या पथकाने तसेच अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली.