RBI च्या त्या निर्णयाचा परिणाम थेट तुमच्या EMI वर होणार.

प्रत्येकाच्या आयुष्यात चार भिंतीच, हक्काचं आणि स्वतःचं असं घर असणं हे मोठं स्वप्न असतं. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यांना अनेक परिश्रम घ्यावे लागतात. सध्या महागाईचं प्रमाण वाढले जमिनींचे रेट वाढले, तर घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्यचे दर वाढलेला आहे आणि यातच घर घेण्यासाठी लागणार गृहकर्ज देखील महागल आहे. याबद्दलची ही बातमी आहे.
आरबीआयच्या निर्णयामुळे गृहकर्ज कर्जाच्या हप्त्यांत वाढ होणार आहे असे संकेत मिळू लागलेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या रेपो दरवाढीचा निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्य वरती होताना दिसत आहे. या निर्णयानंतर सार्वजनिक आणि खाजगी बँकांसह गृहनिर्माण वित्त कंपन्यांचा दरात मोठी वाढ करत आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम ग्राहकांच्या EMI वर होत आहे. सलग तिसऱ्यांदा गृह कर्ज महाग केले.
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर हा निर्णय त्यांनी घेतला आहे. ते सर्वसामान्यांच्या खिशाला यामुळे कात्री लागणार आहे. या निर्णयामुळे सध्या सुरू असणाऱ्या गृह कर्जाच्या हप्त्यांत भली मोठी वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांचा बचतीचा वेळापत्रक बिघडू लागले आणि याचा फटका सहन करावा लागतोय. 50 लाख रुपयांच्या 8.25 टक्के व्याजानं 20 वर्षांसाठी 42 हजार 603 इतका हप्ता भरावा लागतोय.
गृहकर्जाच्या व्याजदरात 0.25 टक्के वाढ झाल्यानंतर गृहकर्जावरील व्याजदर 8.5 टक्के इतका होईल, अशा ग्राहकांना 44 हजार 186 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. दर महिन्याला १५८३ जास्त मोजावे लागणार आहेत. एका वर्षात आपल्या बजेट वरती अठरा हजार 996 रुपये इतके अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे आता गृहकर्ज महाग झाले, त्यामुळे घर घेण्याचे स्वप्न महागले असं म्हणायला काय हरकत नाहीये.