जिल्ह्यात हनीट्रॅपचा सिलसिला; अश्लील फोटो, नग्न व्हिडिओ काढून लाखो रुपयांना गंडा.
अहमदनगर जिल्ह्यासाठी ठाणेकर प्रकरण नवीन नाहीये आणि त्यातच आता पुन्हा एकदा एक आणि ट्रेक चा प्रकार समोर आला आहे एक बागायतदारकडून उसने पैसे घेऊन ते परत देण्याच्या बहाण्याने महिलेने असलेल व्हिडिओ आणि फोटो काढले आणि त्यानंतर त्याला धमकी देत लाखो रुपयांना लुटले
एका श्रीमंत बागायतदार कडून उसने पैसे घेतले जातात आणि ते पुन्हा करण्याचा बहाणा करून एक महिला त्याचे असलेले व्हिडीओ व फोटो काढते आणि त्यानंतर त्या बागायतदारकडून तब्बल 40 लाख 50 हजारांची खंडणी वसूल केली जाते आणि प्रकरण यावरच न थांबता त्या बागायतदारकडून आणखी ४ लाख रुपयांची मागणी केली जाते पण मागणी केल्यानंतर बागायतदार पोलीस स्टेशन कडे धाव घेतो. हे प्रकरण अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मधील आहे पैसे देत असताना त्यासंबंधित महिलेला पकडले जाते व तसेच जो आरोपी व्हिडिओ आणि फोटो काढतो त्याला देखील पोलीस अटक करतात.
मिळालेल्या माहितीनुसार 2018 साली हा पीडित बागायतदार आरोपी अनिता गोसावी हिला काही रक्कम उसनवारी म्हणून देतो पण ते पैसे पुन्हा परत देण्यासाठी ती महिला टाळाटाळ करत असते पण बागायतदारने तगादा लावल्याने एक दिवस बागायतदारला पैसे देण्याच्या बहाण्याने भेटण्यास बोलवते. पीडित बागायतदार व महिला बाभळेश्वर या ठिकाणी भेटतात आणि ते पैसे रस्त्यावर कसे मोजायचे म्हणून हॉटेलमध्ये घेऊन जाते. आरोपी महिला स्वतःचे वस्त्र काढून टाकते आणि त्याच वेळेस आरोपी राजेंद्र गिरी फोटो काढतो आणि त्यानंतर हे दोघेही मिळून त्या पीडित व्यक्तीकडे रकमेची मागणी करायला चालू होतात जर ते पैसे दिले नाही तर हा संबंधित व्हिडीओ आम्ही सोशल मीडियाला व्हायरल करू अशी धमकी दोघे जण देतात पीडित व्यक्ती हा बागायतदार व प्रतिष्ठित असल्यामुळे अब्रूला घाबरून तो त्यांना सुरुवातीला 40 लाख 50 हजार रुपये देतो पण एवढे करूनही त्या बागायतदारला ब्लॅकमेलिंग सिलसिला हा चालूच असतो आणि पुन्हा एकदा आरोपी महिला ४ लाख रुपयांची आणखी मागणी करते बागायतदार 4 लाख रुपये न देता पोलिसांकडे धाव घेतो पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्या बागायतदारने झालेला सर्व प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली शिर्डी पोलिसांनी या सगळ्या घटनेचे गांभीर्य समजून घेऊन व त्याची शहानिशा करून पंचनामा तयार केला पन्नास हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आणि त्या खाली साधे कागद असे ४ लाख रुपये तयार केले शिर्डी मधील हॉस्पिटल रोडवर पैसे घेण्यासाठी त्या महिलेला बोलावलं संबंधित महिला त्या ठिकाणी आली देखील त्यावेळी पोलिसांनी सापळा लावलेला असतो आणि त्या वेळेस ते चार लाख रुपये घेताना पोलिस तिला रंगेहात पकडतात.
शिर्डी मधील साईबाबा हॉस्पिटल या ठिकाणी रोडच्या कडेला पोलिसांनी सापळा रचलेला असतो व फिर्यादी ४ लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी पोहोचला घेऊन. आरोपी महिला ते ४ लाख रुपये घेऊन आणखी ४० लाख रुपयांची मागणी करते जर तुम्ही 40 लाख रुपये दिले तर सदरील व्हिडिओ आणि फोटो तुमच्याकडे परत करून टाकू असं ती महिला यावेळी म्हणते आणि अशाच वेळी पोलीस त्या आरोपी महिलेला सरकारी पंच समोर ताब्यात घेतले आणि त्यानंतर शोधाशोध करून दुसरा आरोपी राजेंद्र गिरी याला देखील अटक करण्यात आली.
या दोन्ही आरोपींची आपण पार्श्वभूमी पाहू :
आरोपी महिला अनिता गोसावी व तिचा सहकारी राजेंद्र गिरी हे दोन्ही मित्र आहेत. सदरील आरोपी महिला ही संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी इथली राहणारी असून तिचा तो मित्र गिरी हा लोणी या ठिकाणचा राहणार आहे. दोघेही सोबत राहत होते आणि त्यामध्ये त्यांनी नातेसंबंध जोडत ते आता व्याही देखील झाले आहेत. दोघांनी मिळून फिर्यादी कडून सुरुवातीला चाळीस लाख पन्नास हजारांची खंडणी वसूल केली आहे. त्यानंतर पुन्हा चार लाखाची मागणी करतात आणि चार लाख देत असताना पुन्हा एकदा 40 लाखाची मागणी करतात पण यावेळी तो बागायतदार पैसे देण्यापूर्वी पोलिसांची मदत घेत जोडप्यांचा भांडाफोड करतो शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी यावेळी इतर नागरिकांना देखील आवाहन केले जर कोणाला ब्लॅकमेल केले असेल तर पुढे येऊन गुन्हा दाखल करा तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्याची आश्वासन यावेळी पोलीस निरीक्षक यांनी दिले सदरील दोन्ही आरोपींच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये भादवि 384 नुसार गुन्हा देखील दाखल केला असून सबळ पुरावे पोलिसांकडे आहे.
काय आहे हनी ट्रॅप ?
गुप्त माहिती काढण्यासाठी किंवा पैसे उकळण्याचा उद्देशाने महिलांचा वापर करून एखाद्या पुरुषास आपल्या जाळ्यात ओढायची याला सर्वसाधारणपणे हा हनीट्रॅप म्हटले जाते आणि अशा हनी ट्रॅप पद्धतीचा जगभरात सर्वत्र हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि अलीकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये हनी ट्रॅप च्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे आपण वापरत असलेल्या मोबाईल मध्ये झटपट व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सोशल मीडियात व्हायरल करणं खूपच सहज शक्य असल्यामुळे अशा घटना घडताना दिसतात.