शरद पवारांना धमकीचा फोन ! पाहा कोण आहे, तो व्यक्ती ?
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चाणक्य म्हणून ज्यांची भूमिका महत्त्वाची राहते, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होय , यांची विधानसभा निवडणुकीच्या वेळी सत्तांतरांसाठी भूमिका अत्यंत महत्त्वाची होती , शरद पवार यांच्या मनात आलं तर ते काहीही करू शकतात हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे सल्ले घ्यायचे किंवा द्यायचे असतील तर यासाठी प्रत्येक राजकारणी हा शरद पवार यांच्याकडे जात जातो.
लहानग्यांपासून थोरांपर्यंत सर्वश्रुत असणारे मा.कृषीमंत्री शरद पवार यांना मात्र एका अज्ञाताने धमकीचा फोन केला, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. कुर्डूवाडी येथे दौऱ्यासाठी येऊ नये असा इशारा शरद पवार यांना देण्यात आला, तरी हि त्यांनी दौरा पूर्ण केला. फोनमुळे किंचितही डगमगले नाही फोन करणारी व्यक्ती कोण आहे, त्यांना धमकी का दिली याची माहिती अद्यापही समोर आली नाही.
मुंबई पोलीस कंट्रोल रूमला फोन आला होता, पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा नंबर रेकॉर्ड केला या नंबरचा शोध पोलीस घेत आहेत, धमकीचा हा फोन सोलापूर येथून समोर आला. या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे . खा. शरद पवार यांना धमकी देणारा कोण आहे ? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.