“माझ्यावर रोज २० ते २५ वेळा अत्याचार होतो ” सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल.

अत्यंत लज्जास्पद अशी बातमी समोर येते आहे. अनेक बलात्काराच्या घटना देशात अगदी दर सेकंदाला घडत असतात मात्र अनेकदा गॅंगरेप होतात फसवणूक करून रेप होतात तसेच काही आपल्याच जी घरातली माणसं आहेत त्यांच्याकडूनही या गोष्टी होतात. मात्र ही घटना अत्यंत वेगळी आहे या घटनेने तुमचा संताप अनावर होईल आपल्याच पोटच्या मुलीसोबत अत्यंत वाईट काम तिचे जन्मदाते आई वडील करतात.
समाजात बऱ्याचदा मुलींकडे चुकीच्या नजरेने पाहिलं जातं. मुलगी म्हणजे परक्याचं धन, मुलगी म्हणजे एक जबाबदारी वयात आल्यानंतर मुलींचे लग्न करून दिले जातात. काचेच्या भांड्याला तडा दिला तर पुन्हा त्याचा उपयोग होत नाही असेही म्हटलं जातं. असे अनेक उदाहरणं मुलींबद्दल आहेत कारण मुलगी हा आपल्या परिवाराचा मानसन्मान असतो. अशी समज समाजात असते मात्र अशा काही घटना घडतात ज्यांना आपलं मन देखील सुन्न होता. ही बातमी बिहार मधून आहे बिहार अत्याचार, गुन्हेगारी याबद्दल नेहमीच अव्वल ठरला आहे. मात्र अत्याचाराची हद्द करणारी ही बातमी आम्ही तुम्हाला एका व्हिडिओ मधून दाखवणार आहोत. त्यामध्ये पीडीता म्हणतीये की रोज माझ्यावर २० ते २५ जण बलात्कार करतात. आणि हे माझे आई वडील देखील करू देतात याला माझ्या चुलत्यांचा देखील पाठिंबा आहे.
तिच्यावरती अत्याचार करणारे दुसऱ्या तिसरे कोणी नसून पोलीस ठाण्यातील कर्मचारीच आहेत. असा खुलासा देखील तिने केलाय कायद्याचे आणि जनतेचे जे रक्षक आहेत तेच खुलेआमपणे अशा पद्धतीने गुन्हे करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न उपस्थित राहतो. बिहारच्या समस्तीपुर या ठिकाणचा हा व्हायरल व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलगी आपल्या आई वडील आणि चुलते यांच्यावरती गंभीर आरोप करताना दिसतीये.पैशासाठी माझे कुटुंब माझ्यावर लोकांना बलात्कार करून देतात हा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. पोलीस ठाण्याच्या एस आय आणि सरपंचांनी देखील माझ्यावरती अत्याचार केले तेही माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यादेखत अशी माहिती ही मुलगी या व्हिडिओमध्ये देते.
दिवसाला माझ्यावरती २० ते २५ जण अत्याचार करतात. माझी आई दारू विकण्याचा व्यवसाय करते, जवळच्या पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचारी दारू पिण्यासाठी त्या ठिकाणी येतात. दारू पिल्यानंतर नशेमध्ये ते माझ्यावरती अत्याचार करतात. मी अतिशय असाह्य झाली आहे कोणीही माझी मदत करत नाहीये. कुणीतरी मला मदत करा अशी आर्त हाक या व्हिडिओमध्ये ही मुलगी करते अन्यथा ही लोक मला मारून टाकतील अशी भीती देखील ती व्यक्त करते.
सततच्या या त्रासाला कंटाळून हदबल झालेल्या तरुणीने या व्हिडिओमध्ये आपला पत्ता देखील सांगितला आहे. माझ्यावरती रोज होणाऱ्या अन्यायाची तक्रार मी पोलीस ठाण्यात केलेली नाहीये कारण खुद्द एस आय असलेले मनोज सिंह हाच माझ्यावरती अत्याचार करतो. असेही ती पिडीता म्हणते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पिडीताच्या आई वडील आणि एका तरुणाला अटक केली अशी माहिती समोर येते.
या पीडित मुलीची कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे तिच्या वडिलांचा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दुकानआहे. आई गृहिणी आहे पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अनेकदा घरावर धाड पडली मात्र पैसे देऊन हे प्रकरण दाबण्यात आला. त्यानंतर मात्र वडिलांनीच तिच्यावरती अत्याचार केले असे तिने सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केलेत. वारंवार होत असलेल्या बलात्काराला विरोध केला व तिला मारहाण देखील बऱ्याच वेळा झाली आहे. तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिल्या. बाहेरच्या लोकांकडून अनेकदा अत्याचार केले जातात या बातम्या बऱ्याचदा तुम्ही पाहता वाचता, मात्र खुद्द आपलाच घरातून आई-वडिलांच्या समोर दिवसाला वीस ते पंचवीस जण अत्याचार करत असतील तर त्या मुलीची अवस्था काय असेल हे विचार करण्या पलीकडचा आहे. यामध्ये पोलीस काय तपास करत आहेत यामध्ये असणारे जे पोलीस कर्मचारी दोषी आहे तर त्यांच्यावर ती काही कारवाई होते का हे पहाणे खूप महत्त्वाचे ठरेल