” मला संन्यास घ्यायचा आहे घटस्फोट दे ” असे म्हणून बायको सोबत करायचा दृष्कर्म; लग्नापासूनच करायचा छळ, पहा सविस्तर.

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,पत्नीला वारंवार मानसिक त्रास देत मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे ,पती-पत्नीमध्ये लग्नानंतर वाद झाले किंवा त्यांचे एकमेकांशी जमत नसेल ते घटस्फोट घेतात, अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मला संन्यास घ्यायचा आहे, तू लवकर घटस्फोट दे, असे म्हणत पत्नीला वारंवार मानसिक त्रास देत मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
एकीकडे पतीकडून मानसिक छळ होत असताना आरोपी सासरा भारत गणपत मोरे यानेही पैशाच्या कारणावरून टोमणे मारत शिवीगाळ करीत महिलेला मारहाण केली. तसेच नणंद स्वाती संजय पाटील हिनेही सदानंद यास उचकवून मानसिक व शारीरिक त्रास दिला, असे स्मिता मोरे यांनी फिर्यादित म्हटले आहे.
आरोपी पतीने पत्नीला क्लिनिक टाकण्यासाठी माहेरून पैसे आण म्हणत मारहाण केल्याचीही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्मिता सदानंद मोरे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला स्मिता मोरे यांचा 2014 मध्ये आरोपी सदानंद मोरे याच्याशी विवाह झाला होता, तेव्हापासून आरोपी पती सदानंद हा क्लिनिक टाकायचे आहे. घेतलेल्या घराचे कर्ज फेडण्यासाठी वारंवार वडिलांकडून पैसे आण म्हणून फिर्यादीला त्रास देत होता, दरम्यान, स्मिता मोरे यांनी दिलेल्या या फिर्यादीवरून वरील तिघांसह दत्तात्रय मोरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस पुढील तपास करत आहे.