” मी काही वेडा नव्हतो.अखेर शिवसेना फुटली !” चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट पहा बातमी सविस्तर.
भाजपचे नेते व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील कधी खर बोलून जातात , त्यांची विधान चर्चेत राहतात .काही महिन्यापूर्वी मनावर दगड ठेवून शिंदे मुख्यमंत्री केलं अस म्हणाले होते तर दुसरीकडे शिवसेना ही भाजपा मुळे फुटली याला खतपाणी घालणार विधान केलं , चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्ष कधी फुटला यासंदर्भात खुलासा केला आहे.
दोन अडीच वर्षापासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो. हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असे विधान पाटील यांनी यावेळी केलं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणेही महत्त्वाचे होते. शेवटी ती वेळ साधल्या गेली आणि आपले सरकार आणले, असा खुलासा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
तसेच, मला जेव्हा पक्षाने पुण्यात पाठवले तेव्हा अनेकांनी मला नाव ठेवली होती. पण तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नका. मला पुण्यात पाठवताना दिल्लीत यासंदर्भात विचार करण्यात आला होता. शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला मोठं धाडसं लागतं. त्यामुळे आम्ही त्यांना अंतर जाणवू देणार नाहीत, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
गेले अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने आपण घेतलेल्या अनेक चांगल्या निर्णयांना स्थगिती दिली. आपण जे प्रकल्प सुरू केले, ते रद्द करण्याचे का त्यांच्या सरकाने केले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.