पर- राज्यातील व्यक्तींचा पुळका येत असेल, तर खुशाल तिकडे जाऊन राहा…

राज्यपाल यांच्या विधानावर महाराष्ट्रात वाद पेटला. मुंबई बद्दल जर कोणी बोललं तर प्रत्येक मराठी माणूस हा चिडतो. कारण मुंबई ही संयुक्त महाराष्ट्राचे लढाई जिंकण्यात मिळालेली आहे. मुंबईला मिळवण्यासाठी अनेक जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे एखादा राज्यपाल जर मुंबई बद्दल बोलत असेल तर प्रत्येकाला राग येणे सहाजिकच आहे.
आता हाच राग राजकीय वर्तुळात देखील पहायला मिळतोय यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणतात, ” परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून ही या राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावरती मुंबई उभी आहे, दुसऱ्या राज्याबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तीने खुशाल तिकडे जाऊन राहावं “
या शब्दातच राज्यपालांना त्याने टोला लगावलाय. भगतसिंग कोशारी मुंबईमधील राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुंबई बदल केला. विधानामुळे ते अडचणीत सापडले. तर त्यांच्या विधानावर विरोधकांनी त्यांच्यावर ती टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या बरोबरच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या राज्यपालांच्या या विधानाचा निषेध नोंदवला.