जर रेल्वेने प्रवास करत असाल तर जपून, तुमच्या सोबत देखील अशी घटना घडू शकते ! पहा बातमी सविस्तर.

रेल्वेचा प्रवास करत असताना आपल्याला बऱ्याच वेळेस सांगितलं जातं की जोपर्यंत रेल्वे थांबत नाही तोपर्यंत आपण उतरण्यासाठी किंवा चढण्यासाठी कसलीही घाई करायची नाही. असं करणे आपल्या जीवासाठी धोकादायक असू शकतो तरीदेखील एका ठिकाणी अशी घटना घडली आहे.
रेल्वे अपघातामध्ये बऱ्याचशा घटना घडत असतात या घटनांमध्ये अनेकांचे जीवही जात असतात तर काही ठिकाणी सतर्कता दाखवत अनेकांचे प्राण देखील वाचले गेले आहे. अशीच एक घटना गोंदिया ठिकाणी घडली आहे. ती घटना सीसीटीव्ही मध्ये कैद देखील झाली आहे. या घटनेमध्ये लांब पल्ल्याच्या गाडीतून उतरत असताना एका तरुणीचा तोल जातो. आणि ही तरुणी तोल जाऊन रेल्वेच्या खाली येईल असं वाटत असतानाच त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक धावत येतात. आणि त्या तरुणीला वाचवतात.
सदरील थरार सुरू असताना हा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आपल्याला पाहायला मिळते. तो थरार अंगावरती काटा उभा करेल असा आहे त्या मुलीचा रेल्वेमधून उतरत असताना तोल जातो क्षणाचाही विलंब न करता आरपीएफचे जवान धावत येऊन त्या तरुणीला वाचवतात. ती तरुणी खाली जाणार असतानाच त्या धरूनीला पटकन ओढून काढलं. जर पोलिसांनी ही तत्परताच दाखवली नसती तर त्या तरुणीच होत्याचं नसतं झालं असतं.
या ठिकाणी ते सुरक्षा रक्षक त्या मुलीसाठी देवदूत बनले आहेत. या देवतांनी त्या मुलीचे प्राण वाचवले आहे. असं म्हणतात की, देवदारी त्याला कोण मारी. याची प्रचिती आपल्याला या व्हिडिओ मधून पाहायला मिळतील. अस धावत्या रेल्वेमधून उतरण्याचा प्रयत्न कोणीही करायचा नाही, अन्यथा आपला जीव आपल्याला गमवावा लागेल. प्रत्येक वेळी तुमच्या मदतीसाठी असा एखादा पोलिस अधिकारी किंवा आरपीएफ जवान हा येईलच असं नाही. मात्र जे नियम आहेत त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणे हे आपलं काम आहे. त्यामुळे धावत्या ट्रेन मधून कधीही उतरण्याची किंवा चढण्याची घाई करू नका. सावकाश आणि सुरक्षित प्रवास करा.