तुम्हाला दंड नसेल भरायचा तर ….. वायरमन ने केली अशी मागणी.
सांगोला प्रतिनिधी-, दि . ८ जुलै रोजी वीज चोरीचा ५० हजार रुपये दंड न आकारण्यासाठी वरिष्ठ साहेबांच्या नावे १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगोला येथील वायरमन राहुल बिरबल गंगणे ( वय ३० ) यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले.
यातील तक्रारदारांच्या घरातील वीज कनेक्शन बंद पडल्याने त्यांनी स्वतःच मीटरची तपासणी करुन मीटरची वायर काढून तपासणी करताना काढलेली वायर परत जोडत असताना चुकीची जोडली गेली होती . वीज कनेक्शन समक्ष येऊन मीटरची तपासणी केल्यावर चुकीच्या वायरी जोडल्याचे निदर्शनाला अले.
त्यांनी मीटरचा फोटो काढून तुम्ही मीटरची छेडछाड केला म्हणून त्यास ५० हजारांचा दंड लावावा लागेल असे सांगितले. सबब तडजोडीनंतर साहेबांना बोलून दंड न करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची वायमन गंगणे यांनी मागणी केली असता. याबाबत तक्रारदारांने लाचलुचपत खात्याशी संपर्क साधल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी सापळा लावला. ठरल्याप्रमारणे रकम स्वीकारताना वायरमन गंगणे याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी , उमाकांत महाडिक , अंमलदार पवार यांनी ही कामगिरी केली .