” जास्त बोलाल तर धर्मवीर दिघेंसोबत काय झाल ते सांगेल. ” – मुख्यमंत्री शिंदे.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक धक्कादायक खुलासे वारंवार होतात. शिवसेनेतून शिंदे गट हा वेगळा झाला. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झालं. नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रभर दौरा काढला. याच दौ-यात असताना एकनाथ शिंदे याने धक्कादायक खुलासे केले आहेत.
यामध्ये ते म्हणतात, धर्मवीर आनंद दिघे यांच्या सोबत जे घडलं त्याचा मी साक्षीदार आहे. त्याच्या सोबत घडलेल्या घटना मी माझ्या डोळ्यांनी पहिल्या आहेत तसेच त्याच्यावर ओढवलेले प्रसंग मी पाहिले आहेत. याविषयी मी आज काही बोलणार नाही, पण जेव्हा समोरून तोंड उघडले जाईल तसं मला देखील त्या गोष्टीवर बोलावं लागेल. असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. नकळतपणे हा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच होता.
अन्यायाविरोधात पेटून उठा हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं. आणि मी त्यांचा शिष्य आहे तेव्हा जास्तीत जास्तीत बोलाल तर दिघे साहेबांना बरोबर काय काय घडलं मी उघड करेल. असा इशारा एकनाथ शिंदे यांनी कालच्या सभेत दिला आहे. महाराष्ट्र दौरा करत असताना ते नाशिकच्या दौऱ्यावरती होते. बंडखोर नेते त्याचबरोबर माजी मंत्री दादासाहेब भुसे यांच्या समवेत मालेगावात त्यांचं मोठं शक्तीप्रदर्शन करत सभा झाली. यावेळी त्यांनी भाषण केला यावेळी त्यांनी ठाकरे यांच्या सोबत असणाऱ्या नेत्यांवरती आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती घणाघात केला.
माझ्या माथ्यावर गद्दार म्हणून शिक्का लावला जातोय, पण मी गद्दार नाही आम्ही आनंद दिघे साहेब यांच्या हिंदुत्वाची शिक्षण घेऊन पुढे आलो आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करणार नाहीत अशी वेळ आली तरी आम्ही आमचे दुकान बंद करू असे बाळासाहेब म्हणाले होते. आणि याचाच पुनरुच्चार यावेळी शिंदे यांनी केला मात्र येत्या काळामध्ये धर्मवीर आनंद दिघे विषयावरून राजकारण तापत आहे. निवडणुकांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा वापर केला जातोय हे आपण पाहत आहोत.