जर उप मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मला एकदा सांगायचं ना ?
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अचानक बंड केल्यामुळे राजकीय वातावरणामध्ये अचानकपणे बरेचसे बदल दिसून आले. एकनाथ शिंदे यांच्या अशा वागण्यामुळे अनेक शिवसैनिकांमध्ये रोष पहायला मिळाला बंड करून शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर त्या बंडकोर शिंदेने काही अटी मांडल्या होत्या आणि त्या मान्य झाल्या तरच मी शिवसेनेमध्ये पुन्हा येईल असेही ते म्हणाले. त्या अटींपैकी एक अट अशी होती की मला उपमुख्यमंत्री करा या त्यांच्या अटीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की जर तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हायचं होतं तर किमान ते मला एकदा सांगायचं ना मी माझ्या शिवसैनिकांच्या पाठीमध्ये वार करणार नाही कारण आम्ही ती औलाद नाही. पुढे ते असे म्हणतात कि भाजपासोबत न जाता महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला तसेच जर तुम्ही मला म्हणाला असतात की मला उपमुख्यमंत्री करा तर मी तसाही निर्णय घेतला असता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना असे म्हणतात की, ” मुख्यमंत्री म्हणून मी तरी कुठे सुख उपभोगले आहे ? कधी त्या मुख्यमंत्रिपदाचा आनंद घेतला आहे सांगा सत्तेमध्ये आल्यानंतर कोविड आला त्या सोबत या रोगाची आव्हाने आली. मला यामध्ये कुठलीही सहानभूती नको आहे एक सांगा शिवसेना पक्षातील मंत्रीपद, मोकळेपणा तुम्हाला मिळाला तो कुठेही मिळाला असता का ? मी कुठल्याही खात्यामध्ये कधीच लुडबुड केली नाही आणि असे स्वतंत्र जर तुम्हाला इतर पक्षांमध्ये मिळणार असेल तर तुम्ही खुशाल जाऊ शकता असं बोलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला बाहेरचा रस्ता मोकळा केला
सर्दी झालेला आवाज त्याचप्रमाणे खोकला आणि त्यामध्ये कोरोनाची लागण हे सर्व काही जलद असताना मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना बळ दिलं त्यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांची मातोश्री निवासस्थानावरून ऑनलाइन संवाद साधला