महत्वाची बातमी : महिलेच्या विनयभंग प्रकरणी कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय, पहा काय आहे कोर्टाचा निर्णय.

केरळमधून विनयभंगप्रकरणी एक बातमी समोर येतीय, महिलेने उत्तेजित कपडे घातल्यास लैंगिक शोषणाचा गुन्हा होत नाही असं न्यायालयाने म्हटले, नेमकं काय घडलं ?
2020 मध्ये एका शिबिरात तरुण लेखिकेचा विनयभंग झाला होता. लेखिकेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी विनयभंग लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला होता, मात्र ही घटना घडली त्यावेळी महिलेसोबत इतरही लोक तिथे होते. त्यामुळे ही केस खोटी असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला.
महिलांना उत्तेजित कपडे परिधान केले असल्यास त्याच्यासंबंधी भादवि कलम 354 अ अनुसार सुकृत दर्शनी गुन्हा होऊ शकत नाही असं मत केरळच्या सत्र न्यायालयाने नोंदवले. सामाजिक कार्यकर्ते लेखक सिविक चंद्रन यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज आज मंजुरी देताना. सुनावणीत न्यायालयाने म्हटले, आरोपीने जे फोटो न्यायालयात सादर केले त्यावरून तक्रारदार महिलेची वेशभूषा ही उत्तेजना निर्माण करणारी दिसून येते.
यात केरळ महिला आयोग यांनी म्हंटल की, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याबाबत याद्वारे अतिशय चुकीचा संदेश जात आहे. केरळ महिला आयोग न्यायालयाच्या या मतावर चिंता व्यक्त करताना केरळ महिला आयोगाच्या अध्यक्ष पी.सतीदेवी यांनी न्यायालयाचे हे मत दुर्दैवी असल्याचे सांगितले.
या प्रकरणी साक्षीदारांची साक्ष तसेच खटला चालवण्याआधीच न्यायालयाने अशी टिप्पणी करत तक्रारदार महिलेचे आरोप फेटाळले. तर उलट न्यायालयाने तक्रारदार महिलेची वेशभूषा ही उत्तेजना निर्माण करणारी दिसून येते. ही टिप्पणी करून न्यायालयाने आरोपीला पाठीशी घातलं अस म्हंटल जात.